Home »National »Other State» ISRO Launched 31 Satellites With One Set Self Made 100th News And Updates

इस्रोची मोठी झेप; 100 वा उपग्रह प्रक्षेपित, एकाच वेळी 31 उपग्रह अंतराळात पाठवले

दिव्य मराठी वेब टीम | Jan 13, 2018, 02:04 AM IST

श्रीहरिकोटा-भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी एकाच वेळी ३१ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले. यात २८ उपग्रह कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, यूक, अमेरिका आणि इतर देशांचे तर ३ भारताचे आहेत. इस्रोनिर्मित १०० वा उपग्रह कार्टाेसॅट-२ चाही समावेश आहे. प्रक्षेपणासाठी पीएसएलव्ही-सी ४० चा वापर करण्यात आला. इस्रोने या आधी फेब्रुवारी २०१७ मध्ये विक्रमी १०४ उपग्रह प्रक्षेपित केले होते.

> १३२३ किलो वजन ३१ उपग्रहांचे
> ७१० किलो वजन एकट्या कार्टाेसॅट-२चे
> ६१३ किलो वजन इतर ३० उपग्रहांचे


- पीएसएलव्हीने १९९३ पासून आजवर भारताचे ५१ व २८ देशांचे २३७ उपग्रह प्रक्षेपित केले.
- १९७५ पासून १९९६ पर्यंत २५ उपग्रह सोडले होते. १९९५ पासून ७७ उपग्रह पाठवण्यात आले.


कार्टाेसॅट-२चे कार्य
हा अत्याधुनिक उपग्रह जीआयएस आधारित मॅपिंग करेल. म्हणजेच तो रस्ते, पूल, धरणांसारख्या पायाभूत विकास कार्यांना पूर्ण करण्यासाठी पृथ्वीची छायाचित्रे संबंधित विभाग आणि राज्य सरकारांना देईल.


> नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा म्हणाल्या, अाता ‘चांद्रयान-२’ मोहिमेकडे सर्वांचे लक्ष
इस्त्राेने अार्यभट्ट, भास्कर या उपग्रहांपासून केलेला प्रारंभ ते १०० वे उड्डाण ही कामगिरी एेतिहासिक अाहे. तंत्रज्ञान व संशाेधनाच्या जाेरावर चांद्रयान व मंगळयान या माेहिमादेखील यशस्वी झाल्या अाहेत. अाता या सर्वांचे लक्ष मार्चमधील ‘चांद्रयान-२’ या माेहिमेकडे अाहे.
- अपूर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर, ‘नासा’ (नाशिकच्या रहिवासी )

Next Article

Recommended