आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू- जम्मू-काश्मीरमधील बहुतेक लोक सध्या हेल्मेट आणि सीट बेल्ट लावून नियमांचे पालन करत आहेत. राज्यातील वाहतूक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बसंत रथ यांच्यामुळेच हा बदल दिसून येत आहे. स्थानिक माध्यमे आणि लोक त्यांना सिंघम किंवा दबंग म्हणून संबोधतात. १२ फेब्रुवारीला त्यांनी कार्यभार सांभाळला आणि ९० दिवसांत वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीत जम्मू-काश्मीरला देशातील टॉप शहरांच्या यादीत बसवणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर हेल्मेट न घालणाऱ्या आणि चुकीचे नंबर असलेल्या वाहनधारकांना दंड करण्यास सुरुवात केली आहे.
पोलिस जीपला नंबर प्लेट नसल्याने त्यांनी लगेच दंड ठोठावला. बसंत सध्या फुटपाथ रिकामे करण्याचे काम करत आहेत. हा निर्णय गरीब लोकांच्या विरोधात असल्याचे म्हटले गेले. यावर बसंत यांनी लिहिले की, ‘मी गरिबी पाहिली आहे. माझी आई अनेकदा उपाशी राहिली. पण माझ्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी असून मला कुठल्याही परिस्थितीत ती पूर्ण करायची आहे.’
२००० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले बसंत यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. पोलिसांच्या पोशाखात ते खूप कमी वेळा दिसतात.
सरकारच्या धाेरणावरही करतात टीका
बसंत आवश्यक वाटेल तेव्हा सरकारच्या धोरणावरही टीका करतात. एका वेबसाइटवर त्यांनी मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, नक्षलवादावर जेएनयूच्या विद्यार्थ्यांना नाही तर राजकीय संबंध असणाऱ्या माफियांना प्रश्न विचारला पाहिजे. यानंतर गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीर सरकारला नोटीस पाठवून बसंत यांनी व्यक्त केलेल्या बाबींवर आक्षेप व्यक्त केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.