आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • महबुबांच्या बहिणीच्या बदल्यात सोडले होते दहशतवादी Jammu Kashmir Abductions By Militants And Advantage

J&K: सोज यांची मुलगी, आझाद यांचा मेहुणा आणि महबुबांच्या बहिणीच्या बदल्यात सोडले होते दहशतवादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. - Divya Marathi
मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.

श्रीनगर - काश्मीर बाबद वादग्रस्त वक्तव्य करुन सैफुद्दीन सोज आणि गुलाम नबी आझाद सध्या चर्चेत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये एक बाब कॉमन आहे. या दोघांच्याही जवळच्या नातेवाईकांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते आणि त्या बदल्यात जेलमध्ये कैद असलेल्या दहशतवाद्यांना सोडावे लागले होते. याशिवया जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांच्या बहीणीसाठीही दहशतवाद्याची मुक्तता करण्यात आली होती. 

 

रुबिया सईद (1989)
- मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी आणि नुकतीच भाजपने ज्यांची साथ सोडली त्या जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांची बहीण रुबिया सईद यांचे 1989 मध्ये अपहरण झाले होते. त्यावेळी सरकारने रुबिया यांच्या सुरक्षित वापसीसाठी 5 दहशतवाद्यांची मुक्तता केली होती. त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद केंद्रीय गृहमंत्री होते. 

- केंद्रात व्ही.पी.सिंहांचे सरकार होते. व्ही.पी. सिंह यांनी आठ दहशतवाद्यांच्या सुटकेचा निर्णय जाहीर केल्यानंतर सहा दिवसांनी दहशतवाद्यांनी रुबिया यांना सोडले होते. 
-1989 मध्ये सोडण्यात आलेला जावेद अहमद जारगर याने 1999 मध्ये काठमांडूमध्ये इंडियन एअरलाइन्सचे आयसी 814  विमान हायजॅक केले होते. हे विमान कंधारला नेण्यात आले होते. या विमानातील प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी करण्यात आली होती. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी सरकारने सोडलेल्या दहशतवाद्यांमध्ये मौलाना मसूद अझहरचा समावेश होता. याने नंतर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली होती. 

 

नाहिदा सोज (1991)
- वादग्रस्त वक्तव्य करुन नकतेच चर्चेत आलेले काँग्रेस नेते सैफुद्दीन सोज यांची मुलगी नाहिदा सोज हिचे ऑगस्ट 1999 मध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. सोज तेव्हा नॅशनल कॉन्फ्रन्सचे खासदार होते. जम्मू-काश्मीर स्टुडंट लिबरेशन फ्रंट (जेकेएसेलएफ) या दहशतवादी संघटनेचा अपहरणात महत्त्वाचा रोल होता. नाहिदाला सोडण्यासाठी सरकारने पाकिस्तानचा खूंखार दहशतवादी मुश्ताक अहमदची मुक्तता केली होती. 

 

तसद्दुक देव (1992)
- काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा मेहुणा तसद्दुक देवचे जानेवारी 1992 मध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. आझाद तेव्हा केंद्रात संसदीय कार्य मंत्री होते. आझाद यांच्या मेहुण्याच्या मुक्ततेसाठी तीन दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...