आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सर्व 9 मंत्र्यांचे राजीनामे Jammu & Kashmir All BJP Ministers Resign Included Deputy CM Nirmal Singh

जम्मू-काश्मीर: उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सर्व 9 मंत्र्यांचे राजीनामे, पीडीपीला पाठिंबा कायम राहील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - जम्मू-काश्मिरात पीडीपी आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी भाजपच्या 9 मंत्र्यांनी मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांना राजीनामे सोपवले. सूत्रांनुसार, मंगळवारी संध्याकाळी अचानक मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त आले, यात उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांचेही नाव आहे. सूत्रांनुसार, राजीनामा देण्यासाठी दिल्लीहून हायकमांडचा आदेश आला होता. मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये प्रस्तावित फेरबदल पाहता मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. दुसरीकडे हे प्रकरण कठुआशी जोडून पाहिले जात आहे. यादरम्यान, राम माधव 3 दिवसांत दुसऱ्यांदा बुधवारी जम्मूला पोहोचत आहेत. ते येथे पक्षनेत्यांसोबत बैठक घेतील.

 

नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे कारण- सूत्र
- सूत्रांनुसार, पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होतील, यात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. दीर्घ काळापासून भाजपकडून नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदी बसवण्यावर खल सुरू आहे.
- पक्षाने आपल्या मंत्र्यांना यामुळेच राजीनामे देण्यासाठी सांगितले आहे. जेणेकरून नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकेल. कोअर ग्रुपच्या बैठकीतही ही बाब स्पष्ट झाली. सांगण्यात आले की, राजीनामा देण्याचा अर्थ पीडीपीकडून पाठिंबा काढणे नाही, मेहबूबा सरकारला सपोर्ट सुरूच राहील.
- पीडीपी सूत्रांनीही सांगितले की, भाजपचे हे पाऊल आघाडी कायम ठेवून मंत्रिमंडळात आपली भागीदारी नव्याने पुनर्गठित करण्यासाठी आहे.

 

कठुआप्रकरणी 2 मंत्र्यांनी दिला होता राजीनामा
- यापूर्वी कठुआत चिमुकलीवर झालेल्या रेप आणि हत्येच्या घटनेनंतर दोन मंत्र्यांनी उद्योगमंत्री चंद्रप्रकाश गंगा आणि वनमंत्री लालसिंह यांनी राजीनामा दिला होता. यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली होती.
- या दोन्हींवर कथितरीत्या कठुआ गँगरेपच्या आरोपींचे समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सामील झाल्याचा आरोप होता. दोन्ही मंत्र्यांनी मेहबूबा मुफ्ती यांना राजीनामा सोपवला होता, जो त्यांनी मंजूर केला.
- तथापि, भाजप नेते राम माधव यांनी स्पष्ट केले होते की, हे मंत्री रॅलीच्या समर्थनार्थ नाही, तर त्यात सहभागी होणाऱ्यांची समजूत घालण्यासाठी आणि परिस्थिती चिघळू नये यासाठी गेले होते.

 

विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे भाजप
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पीडीपी आणि भाजप आघाडीचे सरकार आहे. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्री आहेत. पीडीपी 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष आणि भाजपा 25 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. नॅशनल कॉन्फ्रेंस 15 जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकावर, तर काँग्रेस 12 जागांसोबत चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

 

मेहबूबा कॅबिनेटमध्ये सध्या तीन जागा रिकाम्या
- लाल सिंह आणि चंदर प्रकाश यांच्या राजीनाम्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्र्यांची संख्या 22 झाली आहे. यात भाजपचे 9 मंत्रीही सामील आहेत. यापूर्वी पीडीपी सरकारने मागच्या महिन्यात आपले अर्थमंत्री हसीब द्राबू यांना हटवले होते. यामुळे सध्या कॅबिनेटमध्ये 3 जागा रिकाम्या झाल्या आहेत.

 

राजीनामा देणारे मंत्री म्हणाले- पंतप्रधानांसाठी अडचण निर्माण झाली होती...
- कठुआ गँगरेप-मर्डर केसची चौकशी सीबीआयकडून होण्याची मागणी करत भाजप नेते लालसिंह यांनी मंगळवारी येथे पायी मोर्चा काढला. सोबतच त्यांनी म्हटले की, पंतप्रधान आणि देशासाठी अडचणी निर्माण झाल्या म्हणून राजीनामा दिला होता.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...