आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • जम्मू कश्मीर: अनंतनागच्या श्रीगुफवाडामध्ये एन्काउंटर, सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा केला खात्मा Jammu Kashmir Anantnag Srigufwara Encounter News And Updates

काश्मिरात सुरक्षा दलांनी इस्लामिक स्टेटच्या चीफसहित 4 दहशतवाद्यांचा केला खात्मा, 1 जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या चकमकीत इस्लामिक स्टेट जम्मू अँड काश्मीर (आयएसजेके) संघटनेचा म्होरक्या दाऊद अहमदी सोफी ऊर्फ बुऱ्हाणसह चार अतिरेकी मारले गेले. हे सर्व जण आयएसशी संबंधित होते. या संघटनेचे अतिरेकी मारले जाण्याची काश्मीर खोऱ्यातील ही पहिलीच वेळ आहे. चकमकीत एक जवानही शहीद झाला. तर, ज्या घरात अतिरेकी लपून बसले होते त्या घराचे मालक मोहम्मद युसूफ हे पण गोळीबारात मारले गेले आहेत. त्यांची पत्नी हाफिजा जखमी आहे. 


खिराम गावातील घरात ३-४ अतिरेकी लपून बसलेे. सुरक्षा दलांनी त्यांना वेढा घातला. अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत चारही अतिरेकी मारले गेले. त्यात दाऊद सोफी माजिद दार, आदिल रहेमान भट व मोहम्मद अशरफ इटू यांचा समावेश आहे. 


३३ वर्षीय दाऊद इसिसशी संबंधित आयएसजेके संघटनेचा म्होरक्या होता. या अतिरेकी संघटनेत सहभागी होण्यापूर्वी तो दगडफेक आणि तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्येतही सहभागी होता. 


६ दिवसांत ७ टिपले 
रविवारी सरकारने एकतर्फी संघर्षविराम मागे घेतला. त्याच्या ६ दिवसांत ७ अतिरेकी टिपले गेले. मंगळवारी त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन कडव्या अतिरेक्यांना ठार मारण्यात आले होते. २८ जून रोजी सुरू होत असलेल्या अमरनाथ यात्रेपूर्वी केलेली ही कारवाई सुरक्षा दलांचे मोठे यश आहे. 

बातम्या आणखी आहेत...