आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान दरम्यान काश्मीरात 267% हल्ले वाढले, बंदी उठवताच 4 दहशतवाद्यांना कंठस्नान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये रमजानच्या काळात सीजफायर दरम्यान दहशतवादी हल्ल्यांमध्ये 267 टक्के वाढ झाली होती. 17 एप्रिल ते 17 मे दरम्यान राज्यात 18 दहशतवादी हल्ले झाले होते. तर, रमजानच्या महिन्यात 17 मे ते 17 जून या काळात 66 हल्ले झाले. सोमवारी सकाळी सैन्याने केलेल्या कारवाईत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. राज्यात सर्च ऑपरेशनवरील बंदी हटवल्यानंतरची ही पहिली मोठी कारवाई आहे. 

 

डीजीपी काय म्हणाले... 

- राज्याचे डीजीपी एसपी वैद्य म्हणाले, 'अमरनाथ यात्रेकरुंना आम्ही निमंत्रित करतो. त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र सुरक्षा रक्षकांकडून संरक्षणाबाबत दिल्या जाणाऱ्या सुचनांकडे दुर्लक्ष करु नये.'
- यंदा अमरनाथ यात्रा 28 जून रोजी सुरु होत आहे. मात्र खोऱ्यात आयएसआयएसचा वाढत्या हस्तक्षेपाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर वैद्य म्हणाले, 'आयएसआयएस, लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद सर्व एक सारखेच आहेत. त्या सर्वांशी एक सारखाच मुकाबला करावा लागणार आहे. आम्हाला जे जे करणे शक्य आहे ते आम्ही करत आहोत.'
- श्रीनगरमध्ये ईदच्या दिवशी नमाज झाल्यानंतर भारतीय सैन्यावर युवकांकडून दगडफेक झाली होती. यात पाकिस्तान आणि आयएसचे झेंडेही फडकवण्यात आले होते. त्याच दिवशी श्रीनगरच्या पंथा चौकात दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले होते, आणि गोळीबार केला होता. याची जबाबदारी आयएसने स्वीकारली होती. 

 

रमजान दरम्यान मारले गेले 22 दहशतवादी 
- रमजानच्या महिन्यात सर्च ऑपरेशनवर बंदी घालण्यात आली होती. मात्र प्रत्युत्तरा दखल कारवाईवर बंदी नव्हती. या दरम्यान दहशतवादी घटना वाढल्या होत्या. या काळात जम्मू-काश्मीरमध्ये 22 दहशतवादी मारले गेले होते. भारतीय सैन्य, बीएसएफ आणि पोलिसांचे 17 जवान दरम्यानच्या काळात शहीद झाले. सैन्यावर 20 ग्रेनेड हल्ले झाले.

 

बातम्या आणखी आहेत...