आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर CRPF कॅम्पवरील हल्ल्यात 32 तासांनंतर दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - येथे सुमारे 32 तासांनंतर 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळाले आहे.  सोमवारी पहाटे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला. गोळीबारात एक जवान शहीद झाला. दहशतवादी एका इमारतीत लपलेले आहेत. दरम्यान, सुंजवां आर्मी कॅम्पमध्ये मंगळवारी आणखी एका जवानाचे पार्थिव शरीर मिळाले. त्यामुळे हल्ल्यातील शहिदांची संख्या 6 झाली आहे. काश्मीरमध्ये 3 दिवसांत दोन दहशतवादी हल्ले झाले. दोघांची जबाबदारी लश्कर ए तोयबाने स्वीकारली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सुंजवां हल्ल्यामागचा मास्टर माइंड पाक जैशचा म्होरक्या अझहर मसूद आहे. त्याला पाकिस्तानचा पाठिंबा मिळतो. 

 

एक जवान शहीद

- श्रीनगरच्या सीआरपीएफ कॅम्पवर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कराने तो हाणून पाडला. दहशतवादी AK-47 रायफलसह अनेक शस्त्रांसह लढत आहेत. एका काम सुरू असलेल्या इमारतीत ते लपलेले आहेत. सीआरपीएफचे आयजी रवीदीप सहाय यांनी सांगितले की, ज्याठिकाणी दहशतवादी लपलेले आहेत, त्याठिकाणाहून 5 कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले. 

 

CRPF कॅम्पजवळूनच फरार झाला होता दहशतवादी नवीद भट्ट
- श्री महाराजा हरिसिंह हॉस्पिटलजवळच CRPF कॅम्प आहे. या हॉस्पिटलवर 6 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी हल्ला करून पाकिस्तानचा दहशतवादी नवीद भट्टला पळवले होते. 
- पोलिसांनी रुटीन चेकअपसाठी लष्करचा दहशतवादी नवीदला रुग्णालयात आणले होते. त्याठिकाणी पार्किंगमध्ये लपलेल्या त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला करून त्याला पळवले. 

 

बातम्या आणखी आहेत...