आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • श्रीनगर: एन्काउंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, बांदीपोरात लश्कर दहशतवाद्यांनी केली दोघांची हत्या Jammu Kashmir Encounter Terrorists Security Forces Civilians Abducted Killed Let News And Updates

श्रीनगर: एन्काउंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, बांदीपोरात लश्कर दहशतवाद्यांनी केली दोघांची हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- सुरक्षा दलाला तबेला चटबल परिसरात दहशतवादी लपून बसल्याची सूचना मिळाली.
- मागच्या महिन्यात सुरक्षा दलांनी एका दिवसांत 12 दहशतवादी ठार केले होते.

 

जम्मू - श्रीनगरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केले आहे. सुरक्षा दलाला तबेला चटबल परिसरात दहशतवादी दडून बसल्याची सूचना मिळाली होती. यानंतर तेथे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला आणि सर्च ऑपरेशन एन्काउंटरमध्ये बदलले. दुसरीकडे, बांदीपोरा जिल्ह्यात लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी 2 जणांचे अपहरण करून हत्या केली.


काल रात्रीच केले होते अपहरण
- पोलिसांच्या मते, दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री बांदीपोराच्या शाहगुंड हाजिन गल्लीत गुलाम हसन डार (45) आणि बशीर अहमद डार (26) यांचे अपहरण केले होते. शनिवारी पहाटे 3.30 वाजता त्यांची हत्या करण्यात आली. हसन आणि अहमद काका-पुतणे होते.
- स्थानिकांना मृत व्यक्तींचे मृतदेह शाहगुंडच्या एका मशिदीजवळ आढळले.  
- अधिकाऱ्यांचे मते, प्राथमिक तपासानुसार हत्या लश्करच्या दहशतवाद्यांनी घडवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

 

मागच्या महिन्यात काश्मिरात झाली वर्षातील सर्वात मोठी कारवाई
- 1 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध आतापर्यंतीची या वर्षातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली.
- शोपियां आणि अनंतनागमध्ये झालेल्या 3 एन्काउंटरमध्ये 12 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात लेफ्टिनंट उमर फैयाज यांचे दोन मारेकरीही सामील होते. चकमकीत 3 जवानही शहीद झाले होते. यावर्षी दहशतवाद्यांविरुद्ध एका दिवसातील ही सर्वात मोठी कारवाई होती.
- 15 जानेवारी रोजी उरी सेक्टरच्या दुलंजामध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

 

कोणत्या एन्काउंटरमध्ये किती दहशतवादी ठार झाले?

- द्रगड़, शोपियां : 7 दहशतवादी

- कचदूरु, शोपियां: 4 दहशतवादी (यात एक लश्करचा टॉप कमांडर)

- दायलगाम, अनंतनाग: 1 दहशतवादी (येथे दहशतवाद्याची मदत करणाऱ्याला अटक)
- डीजीपी एसपी वैद्य म्हणाले, ''अनंतनागमध्ये आमच्या एसएसपींनी जगातील असा पहिला प्रयत्न केला. त्यांनी दहशतवाद्यांना कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावले. 30 मिनिटांपर्यंत दहशतवाद्यांशी त्यांची बातचीत होऊ दिली, जेणेकरून त्यांनी आत्मसमर्पण करावे. परंतु हिजबुलच्या एका दहशतवाद्याने कुटुंबीयांचे म्हणणे ऐकले नाही आणि गोळीबार सुरूच ठेवला. जवानांनी त्याचा खात्मा केला, तर दुसऱ्याने मात्र सरेंडर केले.'' 

बातम्या आणखी आहेत...