आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरात पाच अतिरेकी ठार; विद्यापीठातील दहशतवादी प्राध्यापकाचाही खात्मा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रा. माेहंमद रफी - Divya Marathi
प्रा. माेहंमद रफी

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात बडिगावमध्ये रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे पाच अतिरेकी मारले गेले. यात काश्मीर विद्यापीठातील मोहंमद रफी बट या असिस्टंट प्रोफेसरचा समावेश आहे. विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापक असलेला रफी बट शुक्रवारी दुपारी साडेतीनपासून बेपत्ता होता. मृत्यूपूर्वी ३६ तास त्याने िहजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत प्रवेश घेतला होता, अशी माहिती समोर येत आहे. याशिवाय, िहजबुलचा सद्दाम पद्दार, तौसिफ शेख, अादिल मलिक आणि बिलाल ऊर्फ मौलवी या चकमकीत मारले गेले. 

 

व्याप्त काश्मीरमध्ये जाताना तो१८ व्या वर्षी पकडला गेला होता
काश्मीर विद्यापीठात समाजशास्त्राचा प्राध्यापक असलेला रफी बट १८ वर्षांचा होता तेव्हा व्याप्त काश्मीरमध्ये जाताना पकडला गेला होता. त्याचा पिता फय्याज अहमद बट १९९०च्या काळात दहशतवाद्यांसाठी काम करत होता. रफी बट नंतर समाजशास्त्रात पीएचडी करून प्राध्यापक झाला. त्याचे दोन चुलत भाऊ दहशतवादी कारवायांत १९९०च्या प्रारंभीच मारले गेले होते.

 

माफ करा... अल्लाकडे जात आहे
चकमकीत सुरक्षा दलांनी घेरल्यानंतर प्राध्यापक मोहंमद रफी बट याने रविवारी सकाळी पिता फय्याज अहमद बटला फोन केला होता. तो म्हणाला होता, ‘माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर माफ करा. हे शेवटचे बाेलणे आहे... मी अल्लाकडे जात आहे...’

 

कुख्यात बुरहान वाणीची आता टोळीच संपली, १० अतिरेकी ठार
शोपियामध्ये चकमकीत सद्दाम पद्दार मारला गेला आणि हिजबुलचा कुख्यात अतिरेकी बुरहान वाणीच्या संपूर्ण टोळीचा नायनाट झाल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षा दलांनी टाेळीतील ११ दहशतवाद्यांची ओळख पटवली होती. त्यातील १० अतिरेकी मारले गेले. एकाने आत्मसमर्पण केले.

 

बातम्या आणखी आहेत...