आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Sunjwan Terror Attack 3 Terrorist Killed Operation News And Updates

सुंजवां दहशतवादविरोधी ऑपरेशन संपले: 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 5 जवानांना वीरमरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - जम्मूच्या सुंजवां स्थित लष्करी तळावर शनिवार पहाटे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. तेव्हापासून सुरू असलेले ऑपरेशन 30 तासांनंतर संपल्याची घोषणा करण्यात आली. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. दुसरीकडे, सुभेदार मदनलाल चौधरी आणि हवालदार हबीबुल्ला कुरैशी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. कर्नल रँकचे सीओ, मेजर आणि एका सुभेदाराच्या मुलीसह एकूण 9 जण जखमी झाले. आता या कारवाईत एकूणच 5 जणांना वीरमरण आल्याचे पुढे आले आहे.

 

या मोहिमेसाठी ऊधमपूर आणि उत्तर प्रदेशच्या सरसावामधून एअरफोर्सचे कमांडो बोलावण्यात आले आहेत. पूर्ण शहरात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींनी जखमी जवानांची भेट घेतली. सुंजवां कॅम्पवर 15 वर्षांपूर्वी 2003 मध्येही आत्मघातकी हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते.

 

गणवेशात दाखल झाले होते दहशतवादी...
- लष्करी गणवेशात आलेल्या 4 दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेड्स फेकत ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्सच्या फॅमिली क्वार्टरमध्ये घुसले. कॅम्पमध्ये 700 हून जास्त लोक राहतात.
- पहाटे 4.55 वाजता झालेल्या हल्ल्याच्या वेळी बहुतांश लोक झोपलेले होते. बिल्डिंगमध्ये दहशतवादी घुसल्याने मोठी गंभीर परिस्थिती उद्भवली होती. पॅरा कमांडो, स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप, गरुड कमांडो आणि स्नायपर्सनी मिळून रात्री उशिरापर्यंत 150 क्वार्टर्समधून लोकांना सुरक्षित बाहेर काढले होते. 
- कार्रवाई सुरू असताना नागरिकांना धक्का पोहोचू नये याची विशेष दक्षता घेण्यात आली. एका-एका घरात जाऊन शोध घेतला जात आहे. दहशतवादी रात्रीच्या अंधारात पळून जाऊ नये म्हणून जनरेटर आणि फ्लड लाइटही लावण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...