आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, जैशच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरी सेक्टर येथे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. - Divya Marathi
उरी सेक्टर येथे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

श्रीनगर - उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्ष रक्षकांनी चोख प्रत्युत्तर देत त्यांचे नापाक मनसुबे हाणून पाडले. जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी सुरक्षा रक्षकांनी उरी सेक्टरमध्ये सीमे पलीकडून होणारी घुसखोरी हाणून पाडली आहे. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 6 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे डीजीपी एस.पी.वैद यांनी ही माहिती दिली. काश्मीरमध्ये सध्या ऑपरेशन ऑलआउट सुरु आहे. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आला आहे. 

 

सप्टेंबरमध्येही उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उद्धवस्त 
- 28 सप्टेंबरला काश्मीरमधील उरी येथील जोरावर भागात सुरक्षा रक्षकांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यावेळी 3 दिवसांमध्ये काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले होते. 
- 11 डिसेंबरमध्ये जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये सुरक्षा रक्षकांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार केले. डीजीपी वैद म्हणाले, मृत्यूमुखी पडलेले तिघेही पाकिस्तानचे नागरिक होते. 
- 5 डिसेंबरला साऊथ काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी लष्कर-ए-तोएबाच्या 3 दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यातील दोघे पाकिस्तानी नागरिक होते.

 

काश्मीरचे दहशतवादी आपले बांधव - आमदार मीर 

- 11 जानेवारीला पीडीपी आमदार एजाज अहमद मीर यांनी म्हटले होते, की असे कित्येक दिवस चालत राहाणार आहे?  आम्ही 200 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. हा सिलसिला असाच चालत राहील. हे थांबवण्यासाठी कोणालातरी पुढे यावे लागेल. काश्मीर हा राजकीय मुद्दा आहे. त्याला राजकारण्यांनीच सोडवले पाहिजे. 
- मीर म्हणाले होते, 'जे काश्मीरी आहेत ते आमचे बांधव आहेत. मग ते मिलिटंट असले तरी. आमचे जे जवान शहीद होतात त्यांच्या कुटुंबियांसोबतही आमची सहानुभूती आहे.'
काही दिवसांपूर्वीच काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपीच्या एका आमदारांनी दहशतवादी आपले बांधव आहेत, त्यांना मारु नये असे विधान केले होते. 

 

2017 मध्ये काश्मीरमध्ये 337 दहशतवादी घटना, 230 ठार; 75 जवान शहीद 
- जम्मू-काश्मीरमध्ये 2017 या वर्षात 337 दहशतवादी घटना घडल्याचे समोर आले आहे. येथे सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत 203 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दहशतवाद्यांच्या विरोधातील या लढाईत जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराचे 75 जवान शहीद झाले आहेत. ही माहिती 19 डिसेंबरला केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत दिली होती. 
- दुसरीकडे पूर्वोत्तर राज्यात एकूण 97 जणांचा मृत्यू झाला होता. येथे सुरक्षा रक्षकांनी माओवाद्यांविरोधात केलेल्या ऑपरेशनमध्ये 51 जणांना कंठस्नान घातले. तर 12 जवान शहीद झाले. 

बातम्या आणखी आहेत...