आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीनगर - काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांतील कॉन्स्टेबल जावेद अहमद डार यांची हत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शुक्रवारी गुलगामच्या परिवानमध्ये आढळला. जावेद यांचे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेदरम्यान अपहरण केले होते. एक महिन्यातच अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 14 जून रोजी दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यातील जवान औरंगजेबची कलमपोरातून अपहरण करून हत्या केली होती.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, जावेद अहमदला शोपियांच्या कचदुरा गावातील एका मेडिकल दुकानातून अपहरण करण्यात आले होते. असेही वृत्त येत आहे की, दहशतवादी एका कारमधून आले होते आणि जावेदला बळजबरी बसवून निघून गेले. कचदुरामध्ये या वर्षी एका एन्काउंटरमध्ये 5 दहशतवादी ठार झाले होते.
जवान औरंगजेब ईदनिमित्त घरी जात होते:
दहशतवाद्यांनी 14 जून रोजी सैन्यातील जवान औरंगजेब यांचे कलमपोरातून अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. ते आपल्या गावी ईद साजरी करण्यासाठी जात होते. औरंगजेब यांची हत्या करण्याआधी दहशतवाद्यांनी त्यांचा एक व्हिडिओही बनवला होता. यात दहशतवाद्यांनी त्यांना अनेक प्रश्नही विचारले होते. ते 44 राष्ट्रीय रायफलसोबत शोपियांच्या शादीमर्गमध्ये तैनात होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.