आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जया बच्चन यांची संपत्ती सहा वर्षांत झाली दुप्पट; स्थावर संपत्ती यंदाच्या वर्षात 460 कोटींवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- समाजवादी पार्टीच्या राज्यसभेच्या उमेदवार जया बच्चन यांची संपत्ती सहा वर्षांत दुपटीवर गेली आहे. गत शुक्रवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा त्यांनी आपली व पती अमिताभ बच्चन यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील सादर केला होता. त्यातून हे स्पष्ट झाले आहे.  


जया बच्चन यांनी सादर केलेल्या शपथपत्रात २०१२ मध्ये स्थावर व जंगम अशी सुमारे ५०० कोटी रुपयांची संपत्ती होती. यंदा ती वाढून एक हजार काेटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. बच्चन दांपत्याकडे २०१२ मध्ये १५२ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती होती. त्यात यंदाच्या वर्षात ती वाढून ४६० कोटींवर पोहोचली आहे. जया बच्चन यांच्या नावे २०० कोटींची संपत्ती होती. ती वाढून ५४० कोटी रुपयांवर पोहोचली.  


शपथपत्रानुसार बच्चन दांपत्याकडे ६२ कोटी रुपयांचे दागिने होते. त्यापैकी ३६ काेटी रुपयांचे दागिने अमिताभ यांच्या नावे दाखवण्यात आले आहेत तर जया यांच्या नावे २६ कोटींचे दागिने दाखवण्यात आले आहेत, हे विशेष.  

 

बच्चन दांपत्याकडे ४ कोटींची घड्याळे  
अमिताभ व जया यांच्याकडे ४ कोटी रुपयांची घड्याळे आहेत. दोघांकडे मुंबई व दिल्लीत उच्चभ्रू वस्तीत आलिशान बंगले आणि प्लॉट आहेत. बच्चन फ्रान्सच्या ब्रिगनोगनमधील ३ हजार १७५ चौरस मीटर निवासी संपत्तीचेदेखील मालक आहेत. त्यांच्याकडे नोएडा, भोपाळ, पुणे, अहमदाबाद व गांधीनगरमध्ये भूखंड आहेत.  

 

बातम्या आणखी आहेत...