आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक : भाजप बहुमतापासून दूर राहिल्यास 40 जागा जिंकणाऱ्या जनता दल सेक्यूलरला ही संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - कर्नाटकात भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वात मोठा पक्ष म्हणुन पुढे आला आहे. दुपारपर्यंत समोर आलेल्या कलानुसार भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहे. मात्र एकूण 222 जागांवर निवडणूक झाली, त्या नंतर बहुमतासाठी 112 जागा आवश्यक आहे. भाजपला स्पष्ट बहुमतासाठी 10 ते 12 जागा कमी आहेत. त्यामुळे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा आणि त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे (जेडीएस) सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कुमारस्वामींनी आधीच स्पष्ट केले होते की आम्ही किंगमेकर नाही तर किंग होणार आहोत. राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होत असताना सेकंड लार्जेस्ट पार्टी असलेल्या काँग्रेसने पुढाकार घेत जेडीएसला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे. 

 

काय म्हणाले काँग्रेस नेते 

- गुलामनबी आझाद म्हणाले, देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्यासोबत फोनवर आमची चर्चा झाली आहे. त्यांनी आमचा प्रस्ताव स्वीकारला आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले, की आम्ही जेडीएस नेत्यांसह आज सायंकाळी राज्यपालांची भेट घेणार आहोत.

- या निवडणुकीत जेडीएसने चार पक्षांसोबत आघाडी करुन निवडणूक लढली होती. त्यांना 40 च्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. त्यांना मागील जागा कायम राखण्यात यश मिळाले आहे. 

- जेडीएसच्या आघाडीतील बहुजन समाज पक्षाचे (बसपा) कर्नाटकमध्ये खाते उघडले आहे. त्यांना एक जागा मिळाली आहे.

 

भाजपला जेडीएसची गरज पडणार का? 
- निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक आनंदी झालेल्या भाजपचे हसू दुपार होईपर्यंत मावळले आणि जेडीएसला मंद स्मित करण्याची संधी मिळाली आहे. दुपारपर्यंत आलेल्या कलानुसार भाजपला 105 ते 108 जागा मिळतील अशी शक्यता आहे. उर्वरीत दोन जागांवर निवडणूक झाली आणि तिथेही ते विजयी झाले तरी बहुमतासाठी त्यांना तीन-चार जागांची आवश्यकता भासणार आहे. अपक्षांकडून त्यांना फार अपेक्षा नाही. 

- अशा स्थितीत भाजप जेडीएस नेते देवेगौडा आणि कुमारस्वामी यांना ऑफर देऊ शकतात. 
- त्यासोबतच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या कर्नाटकातील 9 जागांवर विजयी होण्यासाठी भाजप कुमारस्वामींना सत्तेत भागीदार करु शकते. 


जेडीएस आणि काँग्रेस एक झाले तर सरकार 
- काँग्रेसने यावेळी स्वबळावर निवडणूक लढली होती. काँग्रेस कर्नाटकात सत्तेत असल्यामुळे त्यांना कोणासोबत आघाडी करण्याची गरजही नव्हती. मात्र आज कल समोर येऊ लागले आणि काँग्रेस सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून पुढे आली. सत्ता काँग्रेसच्या हातून गेली. अशावेळी काँग्रेस आणि जेडीएस या दोघांचा आकडा बहुमताच्या पुढे जात आहे. 
- दरम्यान, काँग्रेसने दावा केला आहे की आम्ही जेडीएसला सरकार स्थापन करण्यासाठी समर्थन देणार आहोत. आमचा प्रस्ताव जेडीएसने स्वीकारला आहे. 
- याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते की काँग्रेसने जेडीएसला सोबत घेऊन निवडणूक लढायला हवी होती.

 

बातम्या आणखी आहेत...