आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIHAR: जेडीयूची लोकसभेच्या 40 जागा लढण्याची तयारी, रालोसपा नेते म्हणाले- NDA सोडणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष बिहारमध्ये आपापले बळ आजमावण्याच्या तयारीत आहेत. जनता दल संयुक्तने (जेडीयू) राज्यातील संपूर्ण 40 जागा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून जेडीयूने प्रत्येक मतदान केंद्रावर कमीत कमी 10-10 कार्यकर्ते तयार करण्याचे अभियान सुरु केले आहे. जिल्हा आणि तालुका अध्यक्षांकडे ही कामगिरी सोपवण्यात आली आहे. 7 जून रोजी झालेल्या बैठकीत एनडीएमधील रालोसपा नेते उपेंद्र कुशवाहा गैरहजर होते. शुक्रवारी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी कुशवाह यांच्याकडे एनडीए आघाडीत दुर्लक्ष होत असल्याचे सांगत त्यांना महाआघाडीत (आरजेडी, काँग्रेस आणि एनसीपी) येण्याचे निमंत्रण दिले होते. 

 

जेडीयूची 25 जागांची मागणी 
- जेडीयूने त्यांच्या अभियानाची संपूर्ण जबाबदारी पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रीय महासचिव (संघटन) रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडे दिली आहे. 
- एनडीएमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या जेडीयूने 25 जागांवर दावा केला आहे. दरम्यान, पक्षाचे महासचिव श्याम रजक म्हणाले जेडीयू बिहारमधील सर्वच्या सर्व 40 लोकसभा जागांवर निवडणुकीची तयारी करत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...