आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावजयीनेच मत्सरापोटी दिराला बुडवून मारले, त्याची तडफड थांबेपर्यंत ड्रमचे झाकण घट्ट दाबून ठेवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - कोलकात्यामध्ये 19 वर्षीय एका तरुणीने मत्सरापायी आपल्या 8 वर्षीय दिराची कथितरीत्या पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. 

 

दिरावर नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम करतात सासरे म्हणून व्हायचा जळफळाट

पोलिसांनी सांगितले की, प्रियंका दास असे आरोपी तरुणीचे नाव आहे. तिला वाटायचे की, तिचे सासरे तिच्या 22 वर्षीय पती सुब्रतच्या तुलनेत दीर रिजू दासवर जास्त प्रेम करतात. मेतियाब्रुज़ येथील राहत्या घरी बाथरूममध्ये रिजूचा मृतदेह पाण्याच्या मोठ्या ड्रममध्ये आढळला. विशेष म्हणजे या घटनेच्या 4 दिवसांनंतर प्रियंकाने आपला पती सुब्रतसमोर गुन्हा कबूल केला आहे.

 

पोलिसांना वाटला अपघाती मृत्यू...

29 जून रोजी रिजूचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिस तसेच कुटुंबीयांना वाटले होते की, बहुधा रिजू बाथरूमला अटॅच असलेल्या टॉयलेटमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असावा, आणि याच प्रयत्नात तो पाण्याच्या मोठ्या ड्रममध्ये पडला असावा. परंतु सोमवारी प्रियंकाने सुब्रतला सांगितले की, रिजी ज्या वेळी अंघोळ करत होता, त्या वेळी तिने पाण्याच्या ड्रमचे झाकण घट्ट बंद केले. जोपर्यंत रिजू तडफडत राहिला, तोपर्यंत तिने ते उघडले नाही. अवघ्या 8 वर्षांच्या रिजूचा तडफडून मृत्यू झाला. याप्रकरणी सुब्रत तसेच त्याचे वडील दुखराम दास यांनी आता प्रियंकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. पोलिस प्रियंकाला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचे आणखी Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...