आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरला होता 3 फुटांचा हा दहशतवादी, जवानांनी घातले कंठस्नान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सम्बुरा परिसरात झालेल्या एन्काऊंटरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा वॉन्टेड टेररिस्ट नूर मोहम्मद तांत्रेय मारला गेला. - Divya Marathi
सम्बुरा परिसरात झालेल्या एन्काऊंटरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा वॉन्टेड टेररिस्ट नूर मोहम्मद तांत्रेय मारला गेला.

 श्रीनगर/नवी दिल्ली - दक्षिण काश्मीरच्या पुलवामामध्ये मंगळवारी एन्काऊंटरमध्ये सुरक्षा यंत्रणांना यश मिळाले. सम्बुरा परिसरात झालेल्या एन्काऊंटरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड टेररिस्ट नूर मोहम्मद तांत्रेय मारला गेला. हा दहशतवादी आतंकी श्रीनगर एअरपोर्टवरील बीएसएफ कॅम्पवर यावर्षी झालेल्या हल्ल्यातीन वाँटेड होता. 2003 मध्ये एका दहशतवादी प्रकरणात त्याता दोषी ठरवण्यात आले होते. 2015 मध्ये त्याला पॅरोल मिळाला. त्यानंतर तो फरार झाला आणि नंतर तो जैशशी संलग्न झाला. 


3 फुटांचा होता तांत्रेय
- 47 वर्षाच्या जैश ए मोहम्मदच्या या दहशतवाद्याची उंची फक्त 3 फूट होती. सेक्युरिटी फोर्सेसने त्याच्या विरोधात सोमवारी रात्री ऑपरेशन सुरू केले होते. अनेक प्रकरणांत त्याचा शोध सुरू होता. बीएसएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणीही तांत्रेयचा शोध सुरू होता. 
- पोलिसांतील सुत्रांच्या माहितीनुसार, तांत्रेयला मारणे हे एक मोठे यश आहे. मोहम्मद तांत्रेयबाबत काही पुरावे मिळाले होते. त्यानंतर त्याला सम्बुरा परिसरातील एका घरामध्ये घेरण्यात आले होते. त्यानंतर बराच वेळ चाललेल्या फायरिंगमध्ये तो मारला गेला होता. श्रीनगर एअरपोर्टच्या बीएसएफ कॅम्पवर केलेल्या हल्ल्यात तांत्रेयचा हात होता. त्यानंतरच सिक्युरिटी फोर्सेससाठी तो डोकेदुखी ठरला होता. त्याला नूर त्राली नावानेही ओळखले जात होते. 

पॅरोलनंतर झाला फरार. 
- तांत्रेयच्या विरोधात 2003 मध्ये दिल्लीमध्ये खटला दाखल करण्यात आला होता. तो श्रीनगरच्या सेंट्रल जेलमध्ये कैद होता. 2015 मध्ये त्याला पॅरोल देण्यात आला. 
- त्यानंतर तो त्रालमध्ये अॅक्टीव्ह झाला होता. याठिकाणी तो जैश-ए-मोहम्मदसाठी काम करत होता. 
- जुलै 2017 मध्ये अरीपाल परिसरात लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांमध्ये एन्काऊंटर झाले. तीन दहशतवादी मारले गेले पण तांत्रेयला पळून जाण्यात यश आले होते. तेव्हापासूनच तो विविध हल्ले घडवून आणत होता. 
- दक्षिण आणि सेंट्रल काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्येही तांत्रियचा हात होता. पोलिसांनी त्याला दुजोरा दिला आहे. तांत्रेयचा मृत्यू हा जैश ए मोहम्मदसाठी एक मोठा धक्का असल्याने सुरक्षा यंत्रणांसाठी हे मोठे यश आहे. 


पोलिस काय म्हणाले... 
जम्मू-काश्मीरचे IGP मुनीर खान म्हणाले, आम्हाला जैशच्या या दहशतवाद्याबाबत माहिती मिळाली होती. तो जैशच्या सर्वच हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता. एन्काऊंटर मंगळवारी सकाळपर्यंत चालले. जैशचा हा दहशतवादी मारला गेला. एक एके 56, प्सितुल आणि बुलेट मॅगझिन त्याच्याकडे होते. 

 

बातम्या आणखी आहेत...