आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K: जम्मू-काश्मिरात आणखी एका जवानाचे अपहरण करून हत्या, घराबाहेर सापडला शाह यांचा मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू काश्मीरचे पोलिस काँस्टेबल सलीम शाह यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. सलीम यांचा गोळ्यांनी चाळणी झालेला मृतदेह शनिवारी त्यांच्या कुलगाम येथील केमोह घाटावर सापडला होता. सलीम यांचे शुक्रवारी रात्री कुलगाम येथून दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. गेल्या दोन महिन्यांत जवानाचे अपहरण करून त्याची हत्या करण्याची अशा प्रकारची हे तिसरी घटना आहे. यापूर्वी दहशतवाद्यांनी 6 जुलै रोजी शोपियां जिल्ह्यात काँस्टेबल जावेद अहमद डार आणि 14 जून रोजी कलमपोरा येथे जवान औरंगजेब यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सलीम सुट्टीवर घरी गेले असताना त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...