आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलिंग करताना एअर होस्टेस झाली ही पंजाबी गर्ल, असे केले स्वप्न पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीनानगर (गुरदासपूर) डोमेस्टिक एअर होस्टेसपासून करिअरला सुरुवात करणारी दीनानगरची काजल बहल एअर इंडियाच्या इंटरनॅशनल फ्लाइट्ससाठी कॅबिन क्रू म्हणून निवडली गेली आहे. काजल बहलला आता दीड लाखांचे मासिक पॅकेज मिळाले आहे. याशिवाय कुटुंबातील 5 सदस्यांना वर्षांतून 8 इंटरनॅशनल फ्लाइट्सशिवाय डोमेस्टिक फ्लाइटमध्ये मोफत प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. 

 

हे आहे यशाचे रहस्य... 
- काजल बहलने जे यश मिळवले आहे त्याचे संपूर्ण श्रेय तिने वडील शामलाल यांना दिले आहे. 
- काजल म्हणाली, मुलींना अॅक्टिंगसाठी सर्वात आधी घरातून विरोध होता. मात्र मी जे यश मिळवले आहे त्यासाठी मला माझ्या पॅरेंट्ससा पूर्ण सपोर्ट होता. हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. 
- काजल आता तीन महिन्यांच्या ट्रेनिंगासाठी मुंबईला जाणार आहे. त्यानंतर इंटरनॅशनल फ्लाइट्ससाठीच्या आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. 
- चित्रपटातील आपल्या करिअरविषयी काजल म्हणाली, सध्या माझ्यासमोर माझे नवे करिअर आहे. 
- तिने मुलींना संदेश दिला  आहे की स्वप्न पूर्ण करायचे असेल तर कोणावरही अवलंबून राहू नका. 

 

स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नका... 
- काजलची आई कमलेश बहल हिमाचल प्रदेशातील चंबा येथे शिक्षिका होत्या. 
- त्यांचे दीनानगर येथील शिक्षक शामलाल यांच्यासोबत लग्न झाले. 
- हिमाचल प्रदेशातील चंबा येथे सरकारी शाळेवर शिक्षिका असल्याने आईने तिथेच राहाण्याचा निर्णय घेतला. काजलचा जन्मही चंबा येथेच झाला. 
- काजल ही चार बहिणींमध्ये सर्वात छोटी आहे. आईजवळ राहूनच काजलचे 10वी पर्यंतचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ती वडीलांकडे दीनानगर येथे आली. 
- दीनानगर येथे सरकारी मॉडेल स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यासोबत फ्रँकफिन इन्स्टिट्यूमधून एअरहोस्टेसचा कोर्स पूर्ण केला. कोर्स पूर्ण होताच मलेशियन एअरलाइनमध्ये ग्राऊंड स्टाफमध्ये तिची निवड झाली. 
- दोन वर्षानंतर काजल इंडिगो एअरलाइनच्या डोमेस्टिक फ्लाइट्समध्ये एअर होस्टेस झाली. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, काजल बहलचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...