आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई/नवी दिल्ली - साऊथचा आणखी एक सुपरस्टार सक्रीय राजकारणात प्रवेश करत आहे. सुपरस्टार कमल हासन याने सक्रीय राजकारणात येत असल्याची घोषणा केली आहे. कमल हासन स्वतःचा राजकीय पक्ष केव्हा स्थापन करणार याची त्यांनी घोषणा केलेली नाही, मात्र 26 जानेवारीपासून राज्याचा दौरा सुरु करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. याआधी साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांनी 31 जानेवारीला राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. कमल हासन 18 जानेवारीला त्यांच्या राजकीय वाटचालीची संपूर्ण माहिती देणार आहेत.
राज्य सरकारवर केले आरोप
- कमल हासन यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा मनोदय आधीच बोलून दाखवला होता. 26 जानेवारीपासून ते तामिळनाडू राज्याचा दौरा करणार आहेत.
- कमल हासन यांनी राज्यातील पलानीस्वामी सरकारवर काही आरोप केले आहेत. राज्य सरकार भ्रष्टाचार रोखण्यात आणि चांगले प्रशासन देण्यात अपयशी ठरल्याचा ठपका कमल हासन यांनी ठेवला आहे.
- हासन यांनी एका कार्यक्रमात सांगितले, की या महिन्याच्या अखेरीस ते एक व्हिसल ब्लोअर अॅप लाँच करणार आहे. या अॅपचे नाव Maiyam Whistle असेल. या अॅपच्या मदतीने तामिळनाडूचे नागरिक करप्शन एक्सपोज करु शकतील.
26 जानेवारीपासून दौरा
- कमल हासन 26 जानेवारीपासून राज्याचा दौरा करणार आहेत. ते तरुण, वृद्ध, महिला सर्वांची भेट घेणार आहेत. हासन म्हणाले, मला काही हवे आहे यासाठी मी राजकारणात येत नाही. त्यांच्या दौऱ्याची सविस्तर माहिती आनंद विकटन मॅगझिनमध्ये प्रकाशित होणार आहे.
- 63 वर्षांच्या कमल हासन यांची फॅन फॉलोइंग तामिळनाडू आणि साऊथच्या अनेक राज्यात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.