आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मक्कल निधी मय्यम: कमल हसनचा नवीन पक्ष स्थापन;मी नेता नाही, तर सहायक: कमल हसन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमल हासन यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली. - Divya Marathi
कमल हासन यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली.

मदुराई- नामांकित अभिनेते रजनीकांत यांच्यानंतर अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक कमल हसन यांनीदेखील बुधवारी तामिळनाडूच्या राजकारणात पाऊल ठेवले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच हजारो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी ‘मक्कल निधी मय्यम’हा नवीन पक्ष स्थापन केला. हिंदीत त्याचा अर्थ लोक न्याय मंच असा होतो. कमल हसन यांनी पक्षाच्या ध्वजाचेही अनावरण केले. ‘मी तुमचा नेता नाही, तर सहायक आहे,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.


तत्पूर्वी, कमल हसन यांनी माजी राष्ट्रपती डाॅ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या घरापासून अापल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. तेथे त्यांनी डाॅ.कलाम यांचे १००वर्षीय थोरले बंधू माेहंमद मुथुमिरान मरैकायर यांचे अाशीर्वाद घेतले. या वेळी हसन म्हणाले की, सहज केल्या जाणाऱ्या प्रारंभातून व विनम्रतेतून महानता मिळवता येऊ शकते. मला डाॅ.कलाम यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेत जायचे हाेते. तसेच तेथे मुलांशी संवाद साधायचा हाेता; परंतु स्थानिक प्रशासनाने त्यासाठी परवानगी दिली नाही. राजकारण्यांना शालेय मुलांशी संवाद साधण्याची परवानगी दिल्यास मुलांमध्ये संभ्रम निर्माण हाेऊ शकताे, हे कारण प्रशासनाने परवानगी नाकारण्यामागे असल्याचे सांगितले. तसेच मी माझ्या चाहत्यांच्या मनात राहताे. मात्र, अाता नव्या भूमिकेतून लाेकांच्या घरात राहू इच्छिताे. त्यासाठी अांध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू हे माझे हीराे अाहेत,  


अागामी काळ अामचा

या वेळी ‘नालई नमाधे’ (अर्थ- अागामी काळ अामचा अाहे) अशी घाेषणा करून सध्या असलेले अण्णाद्रमुक सरकार अत्यंत वाईट असल्याने मी राजकारणात उतरत अाहे, असेही हसन यांनी स्पष्ट केले. हसन यांनी द्रमुक नेते एम.करुणानिधी, एम.के.स्टॅलिन यांच्यासह रजनीकांत यांचीही भेट घेतली अाहे; परंतु अण्णाद्रमुकच्या नेत्यांची भेट घेतली नाही. यातून ते अण्णाद्रमुकविराेधी मतांना अापल्याकडे खेचण्याची रणनीती तयार करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत अाहे. 

 

दाेन चित्रपट अभिनेते सुमारे २४ वर्षे हाेते मुख्यमंत्री

- एम.जी.रामचंद्रन : मुख्यमंत्री बनणारे पहिले चित्रपट अभिनेते. १९५३मध्ये द्रमुकमध्ये प्रवेश, तर १९७२मध्ये अण्णाद्रमुकची स्थापना. १९७७मध्ये प्रथम मुख्यमंत्री बनले. १० वर्षे या पदावर हाेते.

- जे.जयललिता : १९८२मध्ये एमजीअार हे मुख्यमंत्री असताना अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश केला. १९८७ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर पक्षप्रमुख बनल्या. १९९१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी निवड झाली.  ५ कार्यकाळात १४ वर्षे मुख्यमंत्री हाेत्या. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणानंतरही पदावर. 

 

 

बातम्या आणखी आहेत...