Home »National »Other State» Karnataka Assembly Election 2018 Live Updates Bjp Congress Jds

सत्तास्पर्धेचे कर्नाटक: काँग्रेसने प्रथमच भाजपला त्यांच्याच रणनीतीने घेरले, जदला दिला पाठिंबा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अतिशय वेगाने नाट्यमय घडमोडी घडत आहेत. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही

दिव्य मराठी नेटवर्क | May 16, 2018, 12:02 PM IST

  • राजभवनात राजकारण

बंगळुरू/नवी दिल्ली - एक्झिट पोलनुसार कर्नाटकच्या जनतेने त्रिशंकू जनादेश दिला. मंगळवारी घोषित निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तरी बहुमतासाठी अजून ८ जागा हव्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसने भाजपचीच रणनीती वापरून तिसऱ्या स्थानावर राहून किंगमेकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जदला (एस) बिनशर्त पाठिंबा दिला.

जद नेते कुमारस्वामी यांनीही प्रस्ताव लगेच स्वीकारला व सत्तास्थापनेचा दावा दाखल केला. भाजपनेही सत्तेसाठी दावा दाखल केला. यापूर्वी गोवा, मणिपूर व मेघालयात सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसला सत्ता मिळू शकली नव्हती.

काँग्रेसने गोव्यासंदर्भात कोर्टाच्या निकालाचा दिला दाखला
गोव्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा दाखला काँग्रेसने राज्यपालांना दिला. २-३ पक्षांकडे संख्याबळ असेल तर सर्वात मोठ्या पक्षाला पाचारण करण्याची गरज नाही, असे कोर्टाने म्हटले होते. राज्यपाल याविरुद्ध जाऊ शकत नाहीत, असे काँग्रेसचे म्हणणे.

सरकार बनवण्याचे दाेन फाॅर्म्युले

फाॅर्म्युला १

काँग्रेस+जेडीएस+इतर म्हणजे (७८+३८+१=११७)
- ही अाकडेवारी बहुमताहून निश्चितच जास्त अाहे. मात्र ही अाघाडी निवडणुकीनंतरची अाहे. त्यामुळे या अाघाडीला सरकार स्थापनेसाठी प्राधान्य देण्यास राज्यपाल घटनेनुसार बांधील नाहीत.


फाॅर्म्युला २

भाजप + पाठिंबा देणारेे अामदार (१०४+९ = ११३)
- भाजपला बहुमतासाठी नऊ अामदारांची गरज अाहे. काँग्रेस व जेडीएसमधून हे अामदार फाेडावे लागतील. सर्वात माेठा पक्ष या नात्याने राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी अामंत्रित केल्यास त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत मिळू शकते.

...अाणखी एक शक्यता अशीही असू शकते
- याशिवाय तिसरा पर्यायसुद्धा निर्माण हाेऊ शकताे. राज्यपालांनी संधी दिल्यानंतरही भाजप बहुमत सिद्ध करू शकली नाही तर काँग्रेस-जेडीएस यांना बिगर भाजप सरकार बनवता येऊ शकेल.

अाता सूत्रे राज्यपाल वजुभाई यांच्या हाती

राज्यपाल वजुभाई वाला हे काेणाला सरकार बनवण्याची प्रथम संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष अाहे. गुजरातेत माेदींच्या मंत्रिमंडळात वजुभाई ९ वर्षे अर्थमंत्री हाेते. २००१ मध्ये माेदींच्या पहिल्या निवडणुकीसाठी त्यांनी स्वत:चा मतदारसंघ साेडला हाेता.

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कोणत्‍या पक्षाला किती जागा मिळाल्‍या...

Next Article

Recommended