आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • कर्नाटक निवडणूक: भाजपची पहिली लिस्ट जाहीर, 72 उमेदवारांच्या नावांची घोषणा, Karnataka Assembly Election, Karnataka Election 2018, BJP

कर्नाटक निवडणूक: भाजपची 72 उमेदवारांची पहिली लिस्ट जारी, शिकारीपुरातून लढणार येदियुरप्पा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. लिस्टमध्ये 72 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. बीजेपीचे सीएम उमेदवार बी.एस. येदियुरप्पा शिकारीपुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. ते येथून 6 वेळा आमदार निवडले गेले आहेत. तथापि, राज्याच्या 224 जागांसाठी एकाच टप्प्यात 12 मे रोजी मतदान होईल. 15 मे रोजी निकाल येईल. सध्या कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे आणि सिद्धारमैया मुख्यमंत्री आहेत. 

 

रविवारी संध्याकाळी दिल्लीत झाली बैठक, रात्री उशिरा जाहीर झाली लिस्ट
- रविवार संध्याकाळी दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यात नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज आणि बी.एस. येदियुरप्पा उपस्थित होते. मीटिंगनंतर रात्री उशिरा कर्नाटकसाठी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली.

 

17% लिंगायत मतदार, त्यांचे नेते येदियुरप्पा भाजपचा चेहरा
-75 वर्षीय येदियुरप्पा लिंगायत नेते आहेत. राज्यात 17% लिंगायत मतदार आहेत. ते 2007 मध्ये एकदा 7 दिवसांसाठी आणि नंतर 2008 मध्ये मुख्यमंत्री बनले. 2008 मध्ये त्यांनी आपल्या बळावर भाजपला विजयी केले. भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर दबाव टाकला. त्यांना 2011 मध्ये मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. यामुळे नाराज होऊन येदियुरप्पा यांनी 2012 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली होती आणि कर्नाटक जनता पक्ष (केजेपी) ची स्थापना केली. त्यांच्या पक्षापासून वेगळे झाल्यानंतर 2013 मध्ये भाजपचा पराभव झाला. भाजपला फक्त 40 जागा मिळाल्या.

- 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदी त्यांना पुन्हा भाजपमध्ये घेऊन आले. या निवडणुकीत भाजपला राज्यात 28 पैकी 17 लोकसभा जागा मिळाल्या.

 

राज्यात 8% लोकसंख्येच्या कुरुबा समुदायातील आहेत सिद्धारमैया
- 69 वर्षीय सिद्धारमैया 2013 पासून मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने मागच्या वेळी भाजपचा पराभव करून 122 जागा जिंकल्या. त्यांनी मागच्या काही काळापासून एका अशा नेत्याच्या रूपात आपली प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न केला आहे, भाजपच्या हिंदी आणि हिंदूच्या नाऱ्याला विरोध करतो. त्या आपल्या भाषणांमध्ये कन्‍नड आणि दक्षिण भारतीय अस्मिता उद्धृत करतात.

- सिद्धारमैया कुरुबा समुदायासतून आहेत. एकूण लोकसंख्येत त्यांचा 8% वाटा आहे. त्यांनी भाजपला रोखण्यासाठी लिंगायतांना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याचे कार्ड खेळले आहे.

 

17 एप्रिलपासून सुरू होईल कर्नाटकात निवडणूक प्रक्रिया

एकूण जागा: 224

बहुमत: 113

मतदार: 4.90 कोटी

 

 

तारीख निवडणुकीचे वेळापत्रक
17 एप्रिल अधिसूचना जारी होईल.
24 एप्रिल नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख.
25 एप्रिल नामांकनांची छाननी.
27 एप्रिल नामांकन परत घेण्याची शेवटची तारीख.
12 मे मतदान
15 मे निकाल

 

2013 विधानसभा निवडणूक : येदियुरप्पा यांनी भाजप सोडताच काँग्रेसची आली सत्ता

पक्ष जागा व्होट शेअर
काँग्रेस 122 36.6%
जेडीएस 40 20.2%
भाजपा 40 19.9%
इतर 22 23.3%

 

2014 लोकसभा निवडणूक : मोदी लाटेत भाजपला 28 पैकी 17 जागा

पक्ष सीट व्होट शेअर
भाजपा 17 43.4%
काँग्रेस 9 41.2%
जेडीएस 2 11.1%

 

 

बातम्या आणखी आहेत...