आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • कर्नाटकात त्रिशंकु विधानसभेची शक्यता Karnataka Assembly Elections Exit Poll Indicates No Majority To Any Party News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्नाटकात त्रिशंकू विधानसभेची शक्यता: 5 पैकी 4 पोलमध्ये कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 पोलचे अॅव्हरेज- भाजपला 87, काँग्रेसला 100 आणि जेडीएसला 40 जागा मिळतील 
  • त्रिशंकू विधानसभेची शक्यता, काँग्रेस-भाजपमध्ये चुरस, जेडीएस किंगमेकर भूमिकेत 

बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदाना अवघे 20 दिवस उरले आहेत. यापूर्वी विविध न्यूज चॅनल आणि एजन्सीज ओपिनियन पोल जारी करत आहेत. आतापर्यंत 5 मोठे पोल आले आहेत. यापैकी 4 मध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. सर्वांनी राज्यात त्रिशंकू सरकारचा दावा केला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तथापि, भाजपला गतनिवडणुकीतून जागांचा फायदा होताना दिसत आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत. जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत दिसत आहे. फक्त सी-फोर वोटरने आपल्या ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला 126 जागा दिल्या आहेत. पाचही ओपिनियन पोलचे अॅव्हरेज पाहिल्यास भाजपला 87, काँग्रेसला 100 आणि जेडीएसला 40 जागा मिळताना दिसत आहेत.

 

सिद्दारमैया 40 वर्षांत 5 वर्षांची टर्म पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री

> कर्नाटकमध्ये १२ मे रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे. भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) उमेदवार अर्ज भरत आहेत. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी कर्नाटक निवडणूक भाजप आणि काँग्रेससाठी महत्त्वाची मानली जात आहे. कर्नाटक काँग्रेसशासित सर्वात मोठे राज्य आहे. सध्या देशात काँग्रेसची ४ राज्यांत सरकारे आहेत. त्यात कर्नाटक, पंजाब, पुद्दुचेरी, मिझोरामचा समावेश आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतात कर्नाटकच एकमेव राज्य आहे जिथे भाजपने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले होते. काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ४० वर्षांतील पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

> निवडणुकीत १६५ पैकी १५६ पूर्ण केल्याचा त्यांचा दावा आहे. या निवडणुकीत त्यांना सत्ताविरोधी लाटेसह भ्रष्टाचाराचा आरोप, बंगळुरू इन्फ्रा आणि प्रदूषणाची समस्या सोडवण्यात अपयश आल्याची टीका सहन करावी लागत आहे. दलित अत्याचार, बलात्कार प्रकरणे, महागाई, भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून भाजपला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्याशिवाय कर्नाटकमध्ये काही स्थानिक मुद्देही प्रचारात आहेत.

 

कर्नाटकाचे निवडणूक क्षेत्र 

224 विधानसभा जागा आहेत कर्नाटकात. त्या सहा निवडणूक क्षेत्रांत विभागल्या आहेत.

क्षेत्र जागा
हैदराबाद कर्नाटक 31
बाॅम्बे कर्नाटक 50
तटीय कर्नाटक 20
मध्य कर्नाटक 36
दक्षिणी कर्नाटक 51
बंगळुरू कर्नाटक 36

 

 

 

राज्यात 8 मोठे निवडणूक मुद्दे खालीलप्रमाणे

1) शेतकरी :५६% लोक शेतीवर अवलंबून- २०१३ ते २०१७ पर्यंत राज्यात ३५१५ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. राज्यात ५६% लोक शेतीवर अवलंबून आहेत. १६ वर्षांत १३ वेळा दुष्काळाचा सामना केला आहे.

2) हिंदुत्व :मक्का मशीद स्फोटाचा निकाल- राज्यात केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे हिंदुत्वाचा मोठा चेहरा आहेत. मक्का मशीद स्फोटाचा निकाल भाजपसाठी ट्रम्प कार्ड होऊ शकतो. पक्ष काँग्रेसला घेरत आहे.

3) लिंगायत :अल्पसंख्याक धर्माचा दर्जा- राज्यात १८ ते २०% लिंगायत मतदार. त्यांचा १०० जागांवर प्रभाव. सिद्धरमैयांनी निवडणुकीआधी लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा देण्याचे बिल मंजूर करून प्रस्ताव केंद्राला पाठवला.

4) हत्या : पत्रकार लंकेश आणि कलबुर्गी- लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्याऱ्यांना पकडण्यात अपयशी ठरलेल्या सिद्धरमैया सरकारबद्दल लोकांत नाराजी आहे. आमचे कार्यकर्ते राज्यात मारले गेल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

5) भ्रष्टाचार: कर्नाटक सर्वात भ्रष्ट राज्य- भाजपने ३ रेड्डी बंधूंपैकी दोघांना तिकीट दिले आहे. काँग्रेसनेही भ्रष्टाचारातील अनेकांना तिकीट दिले आहे. २० राज्यांत झालेल्या सर्व्हेत लाच देण्यात कर्नाटक सर्वात भ्रष्ट म्हटले गेले.

6) कन्नड ओळख: वेगळ्या झेंड्याला मान्यता- सीएम सिद्धरमैया राज्यात नेहमी हिंदीचा विरोध आणि कन्नडला प्राधान्य देण्याचे समर्थक आहेत. त्यांच्या सरकारने कर्नाटकसाठी वेगळा ध्वजाचे विधेयकही मंजूर केले.

7) पाणी वाटप: शेतकऱ्यांचे ९०० दिवसांचे आंदोलन- कावेरी पाणी वादानंतर शेतकरी आता महादयी नदीचे पाणी गोव्यासोबत वाटप करण्यास विरोध करत आहेत. शेतकरी ९०० दिवसांचे धरणे आंदोलन करत आहेत.

8) दलित: मंत्र्याचे वक्तव्य, घटनेत बदल करावा- राज्यात १९% दलित मतदार आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी घटना काळानुसार बदलावी असे वक्तव्य केले होते. त्यामुळे दलित नाराज आहेत.

 

येदियुरप्पांच्या मुलाला तिकीट मिळाले नाही, ७ उमेदवार जाहीर

*भाजपचे सीएम उमेेदवार येदियुरप्पांचा मुलगा विजेंद्रला तिकीट नाही. येदियुरप्पांनी निर्णयावर आनंद व्यक्त केला.
*येदियुरप्पा म्हणाले की, अमित शहांनी सांगितले तर बादामीतून सिद्धरामय्यांच्या विरोधात निवडणूक लढवेन.
*भाजपने सोमवारी ७ उमेदवारांची चौथी यादी जारी केली. भाजपने २२० जागी उमेदवार जाहीर केले आहेत.

१५ लाख मतदार यंदा राज्यात प्रथमच मत देतील. त्यामुळे या युवकांवर प्रत्येक राजकीय पक्षाचे लक्ष आहे.

 

कर्नाटकचे 5 मोठे ओपिनियन पोल

ओपिनियन पोल भाजप काँग्रेस जेडीएस
एबीपी-सीएसडीएस 89-95 85-91 32-38
इंडिया टुडे-कावेरी 76-86 90-91 34-43
टाइम्स नाऊ -बीएमआर 89 91 40
इंडिया टुडे-कावेरी 76-86 90-91 34-43
सी-फोर 70 126 27
टीवी-9-सी वोटर 96 102 25
अॅव्हरेज जागा 87 100 40
 

- सी-फोरने भाजपला सर्वात कमी 70 आणि एबीपी-सीएसडीएसने सर्वात जास्त 95 जागा दिल्या आहेत. 
- काँग्रेसला सर्वात कमी 85 जागा एबीपी-सीएसडीएसने दिल्या आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...