आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे धरणे, यदियुरप्पांची बहुमत नसताना दुसऱ्यांदा शपथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - कर्नाटकात गेल्या 10 वर्षात दुसऱ्यांदा येदियुरप्पा यांनी बहुमत नसताना मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमत सिद्ध करता येईल एवढे संख्याबळ त्यांच्याकडे नाही, तेव्हा त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल (सेक्यूलर) यांनी निवडणुकीनंतर आघाडी केली आहे. जेडीएसचे एच.डी. कुमारस्वामी यांची विधीमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. दोन दिवसांत त्यांनी दोनवेळा राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली. मात्र गुजरातमध्ये अर्थमंत्री राहिलेले राज्यपाल वजूभाई वाला यांनी बुधवारी रात्री बी.एस. येदियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. या निर्णयाविरोधात काँग्रेसने रात्री 2.10 वाजता सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. गुरुवारी सकाळी 9 वाजता येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली. तेव्हापासून काँग्रेस आणि जेडीएसने रस्त्यावर उतरून विरोध सुरु केला आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याचे गुलामनबी आझाद यांनी म्हटले आहे. 

 

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आंदोलन 
- आज (गुरुवार) सकाळी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार इगलटन रिसॉर्टमधून विधानभवनासमोर पोहोचले. राज्यपालांच्या निर्णयाविरोधात ते महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून धरणे आंदोलन करत आहेत. 
- काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे पर्यवेक्षक म्हणून दिल्लीहून आलेले गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, सिद्धारमैया, जेडीएसचे नेते एच.डी. देवेगौडा धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

 

येदियुरप्पा तीनवेळा मुख्यमंत्री 
प्रथम :12 नोव्हेंबर 2007 ते 19 नोव्हेंबर 2007 (7 दिवस)

दुसऱ्यांदा : 30 मे 2008 ते 31 जुलै 2011 (3 वर्षे 62 दिवस)

तिसऱ्यांदा :17 मे 2018. 

 

येदियुरप्पा दुसऱ्यांदा बहुमत नसताना मुख्यमंत्री 
- 2008 मध्ये भाजपला 110 जागा मिळाल्या होत्या. भाजप बहुमतापासून दूर होती. यावेळी त्यांनी 6 अपक्षांचे समर्थन घेऊन सरकार स्थापन केले होते. त्यानंतर भाजपने काँग्रेस आणि जेडीएसच्या 7 आमदारांना भाजपमध्ये घेऊन बहुमत मिळवले होते. पक्ष बदल कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून या आमदारांना राजीनामा देण्यासही भाजपने राजी केले होते. जेणे करून येथे पोटनिवडणूक होईल. पोटनिवडणुकीत 7 पैकी 5 आमदार विजयी झाले होते. त्यानंतर खाण घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे येदियुरप्पांची गच्छंती झाली होती, त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. 
- यावेळी भाजपकडे फक्त 104 आमदार आहेत. राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि जेडीएस यांचा दावा आहे की बहुमत आमच्याकडे आहे. या दोन्ही पक्षांचे मिळून 116 आमदार होतात. 

 

राहुल गांधींचा येदियुरप्पावर निशाणा 
- येदियुरप्पा यांनी शपथ ग्रहण करण्याच्या 15 मिनीट आधी राहुल गांधी यांनी ट्विट करुन त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'कर्नाटकात बहुमताशिवाय भाजपने सरकार स्थापन करण्याची मागणी करणे हे चुकीचे आहे. ही संविधानाची पायमल्ली आहे.'

बातम्या आणखी आहेत...