आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बंगळुरु - कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत विविध घटकांसाठीच्या अनेक योजना आहेत. शहरी आणि ग्रामीण भागासाठी आरोग्य सुविधांचेही त्यात आश्वासन देण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचा जाहीरनामा हा कर्नाटकच्या जनतेच्या मनातील गोष्टी सांगणार आहे, तर भाजच्या जाहीरनाम्यात तुम्हाला रेड्डी बंधूच्या कल्पना दिसतील आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घोषणापत्र असेल, असे राहुल गांधी म्हणाले.
काय आहे काँग्रेसच्या 52 पानांच्या जाहीरनाम्यात..
- 18 ते 23 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन
- पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकची संस्कृती शिकवणारा 2 महिन्यांचा अभ्यासक्रम
- राज्यातील महाविद्यालयांमध्ये वाय-फाय सुविधा
- पहिली ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षण
- शाळाबाह्य मुलांसाठी निवासी शाळांची सुविधा
- ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा
- जनतेच्या तक्रारींसाठी कॉल सेटर
कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांची लोकसंख्या 21%
- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार.
- शेतकऱ्यांसाठी इन्कम कमिशन तयार करणार .
- कृषि कॉरिडोर तयार करणार.
- एक कोटी नोकऱ्या देणार
राज्यात दलितांची संख्या सर्वाधिक
- दलित: 19%,
- मुस्लिम: 16%
- ओबीसी: 16%
- लिंगायत: 17%
- वोक्कालिगा: 11%
- इतर: 21%
कर्नाटक विधानसभा
एकूण जागा - 224
बहुमत - 113
मतदार - 4.90 कोटी
निवडणूक कार्यक्रम
12 मे रोजी मतदान
15 मे रोजी निकाल
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.