आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक Elections मध्ये प्रचारासाठी नेले होते मोदी-शहांचे कटआउट; आता शेतांमध्ये बनले बुजगावणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकात दोन महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी पीएम मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे कट आऊट लावण्यात आले होते. त्याच कट आऊटचा आता शेतकरी बुजगावणे म्हणून वापर करत आहेत. तारिकेरे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अशा कट आउटचा सर्वाधिक वापर केला जात आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा मतदारांना चांगला परिणाम होईल या हेतूने स्थानिक नेत्यांनी अनेक ठिकाणी असे कटआउट लावले होते. या नेत्यांचे पोस्टर आणि कटआउट पाहून जास्तीत-जास्त गर्दी गोळा करता येईल असे त्यांना वाटले होते. परंतु, भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला आणि कटआउट गावांमध्येच सांभाळून ठेवण्यात आले. 2019 च्या निवडणुकीसाठी ते राखून ठेवता येईल असे त्यांना वाटले होते. 


आमचे नेते आमच्या कामी येत आहेत...
- या कटआउटचा फायदा भाजपला नाही तर येथील गावकऱ्यांना झाला. यावर्षी मानसून खूप चांगले आहे. अशात अन्नधान्य उत्पादन सुद्धा चांगले होणे अपेक्षित आहे. परंतु, त्या शेतीवर नेहमीच पक्ष्यांचे संकट असते. अशात मोदी आणि शहांचे कटाउट मिळाल्याने बुजगावणे बनवण्याची मेहनत वाचली. केवळ वेळच नव्हे, तर बुजगावणे बनवण्यासाठी लागणारा खर्च देखील वाचला असे गावकरी बोलत आहेत. 
- सर्वात आधी कटआउटचा बुजगावणे म्हणून वापर करणाऱ्या राजेशने सांगितल्याप्रमाणे, कर्नाटकात भाजपची सत्ता आली असती तर त्यांनी निश्चितच आमची कामे केली असती. आता त्या नेत्यांचे कटआउट आमची कामे करत आहेत. काहीही असो आमचे नेते आमच्याच कामी येत आहेत. यासंदर्भात स्थानिक भाजप नेत्यांना विचारले असता आपण गावात असा एकही कटआउट पाहिला नाही असे ते म्हणतात. 

बातम्या आणखी आहेत...