आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर-नाटक : काँग्रेस व JDSच्या अामदारांनी 2 तासांत नेते निवडले; सरकार स्थापनेचा दावाही केला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू निकाल जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांदरम्यान सरकार स्थापनेसाठी स्पर्धा सुरू झाली अाहे. बुधवारी भाजपा, काँग्रेस व जेडीएसच्या अामदारांनी केवळ दाेन तासांत नेता निवडण्याची अाैपचारिकता पूर्ण करून सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. या पक्षांनी राज्यातील दूरवरील भागातील अामदारांना अाणण्यासाठी हेलिकाॅप्टर पाठवण्याची घाई केली.


भाजपा अामदारांनी येदियुरप्पांची अामदार गटाचे नेते म्हणून निवड केली. ते तत्काळ राज्यपालांकडे अामदारांच्या समर्थनाचे पत्र देण्यास गेले. अपक्ष अामदार अार.शंकर यांनी भाजपाला पाठिंबा दिला अाहे. जेडीएसच्या अामदारांनी कुमारस्वामी यांना नेता निवडण्याची अाैपचारिकता पार पाडली. कुमारस्वामींनी काँग्रेस नेत्यांसह राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला.  

 

भाजप व काँग्रेस-जेडीएसदरम्यान दिवसभर अाराेप-प्रत्याराेप

काँग्रेस : भाजपाचे ६ अामदार अाहेत अामच्या संपर्कात
- एम.बी.पाटील : अाम्ही सर्व साेबत अाहाेत. तसेच भाजपचे ६ अामदार अामच्या संपर्कात अाहेत.
- शिवकुमार : भाजप अामच्या अामदारांना खरेदी करण्यासह फाेडण्याचा प्रयत्न करतोय.
- सिद्धरामय्या : एकही अामदार बेपत्ता नसून अाम्ही सरकार स्थापत अाहाेत.
- ए.एल.पाटील : मला मंत्रालय देणार असल्याचा भाजप नेत्यांचा फाेन अाला.
- गुलाम नबी : काेणीही कुठेही जात नाहीये. भाजपला प्रयत्न करू द्या.

 

भाजप : १०० % अाम्हीच सरकार स्थापन करू, शंका नाही
- सदानंद गाैडा : भाजप राज्यातील सर्वात माेठा पक्ष अाहे. अाम्हीच सरकार स्थापन करू.
- के.एस.ईश्वरप्पा : अामचेच सरकार असेल यात कुठलीही शंका नाही. १०० % अाम्हीच सरकार स्थापन करू. तुम्ही फक्त पाहत राहा; एकच दिवस झाला अाहे.
- प्रकाश जावडेकर : भाजपकडून काेणालाही खरेदी करण्याचा वा फाेडण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्यांचे नेते अाघाडीमुळे नाराज अाहेत. १०० काेटींचा अाराेप तथ्यहीन अाहे.

 

जेडीएस : भाजपाकडून अाम्हाला १०० काेटींची अाॅफर
- कुमारस्वामी : भाजपाने अामदारांना खरेदी करण्यासाठी १०० काेटींची अाॅफर व मंत्रिपद देण्याचे अामिष दाखवले अाहे. ते जर अामचे २० अामदार फाेडतील, तर अाम्ही त्यांचे २० अामदार फाेडू.
- ए.मंजूनाथ : कुमारस्वामी मुख्यमंत्री बनतील, ही एकमात्र सत्यता अाहे. कारण नागरिक त्यांना मुख्यमंत्री बनलेले पाहू इच्छितात.
- जेडीएस नेते : भाजपा नेत्यांनी अामच्या पाच अामदारांशी संपर्क साधला अाहे.

 

आमदार बेपत्ता : काँग्रेसचे तीन, तर जेडीएसचे दोन आमदार पोहोचले नाहीत  
काँग्रेसचे ३ आमदार, राजशेखर पाटील, नरेंद्र व अनंतसिंह बैठकीला हजर नव्हते. काँग्रेसचे हे तिघे रेड्डी बंधूंच्या जवळचे असल्याची चर्चा आहे. जेडीएसच्या बैठकीत आमदार राजा व्यंकटप्पा नायक व व्यंकटराव नादागौडा पोहोचले नव्हते.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, कुमारस्वामी : वडिलांच्या कारकीर्दीवर लागलेला काळा डाग मिटवायचा आहे...  

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...