Home | National | Other State | Karnataka high court allow Rajasthan woman to donate her kidney

मित्राला Kidney देण्यासाठी महिलेने कुटुंबाच्या विरोधात जाऊन कोर्टापर्यंत दिला लढा, अखेर मिळाले यश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 31, 2018, 04:36 PM IST

कुटुंबाच्या मागणीवर सरकारच्या समितीने या ट्रान्सप्लान्टवर स्थगिती आणण्याची मागणी केली.

 • Karnataka high court allow Rajasthan woman to donate her kidney

  - कुटुंबाच्या मागणीवर सरकारच्या समितीने या ट्रान्सप्लान्टवर स्थगिती आणण्याची मागणी केली.

  - महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने एका दिवसात निर्णय सुनावला.


  बेंगळुरू -
  राजस्थानच्या एका महिलेने लष्करात अधिकारी असलेल्या मित्राला किडणी देण्यासाठी कोर्टात मोठी लढाई लढली. अखेर तिला यशही मिळाली. कुटुंबीय तिच्या या निर्णयाविरोधात होते. त्यांनी सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर महिलेने कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 27 जुलैला ऑपरेशन झाले आणि अधिकाऱ्याला यशस्वीरित्या किडणी प्रत्यारोपित करण्यात आली.


  मीडिया रिपोर्ट्सनुसार महिलेचे वय 48 वर्षे आहे. किडणी डोनर आणि गिफ्ट ऑफ लाइफ अॅडव्हेंचर फाऊंडेशनचे फाऊंडर अनिल श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले. त्यांनी सांगितले की, महिला सुमारे एका वर्षापासून कर्नल यांच्या संपर्कात होती. तेव्हापासूनच तिला त्यांना किडणी देण्याची इच्छा होती. पण महिलेचे कुटुंबीय तयार नव्हते.

  एका दिवसात निर्णय आणि एका महिन्यात परवानगी
  10 एप्रिल 2018 रोजी या प्रकरणी आरोग्य आणि कल्याण विभागाने राज्य प्राधिकरण समिती आणि रुग्णालयाच्या ट्रान्सप्लान्ट पॅनलला पत्र लिहिले. त्यात असे म्हटले गेले की, किडणी डोनेट करण्याची ही प्रक्रिया थांबवा. त्यानंतर महिलेने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. ही स्थगिती हटवण्याची मागणी केली. हायकोर्टाने एका दिवसांत निर्णय सुनावला. एक कमिटी स्थापन केली त्या कमिटीने एका महिन्यात किडणी ट्रान्सप्लान्टची परवानगी दिली.


  फक्त मैत्रीसाठी..
  कमिटीच्या अध्यक्षा डॉ. भानू मूर्ती यांनी सांगितले की, महिलेची बहीण या निर्णयाविरोधात होती. तिने कमिटीला या विरोधात पत्र लिहिले होते. पण त्यांनी म्हटले की, महिला सज्ञान आहे. तसेच किडणी ट्रान्सप्लान्टसाठी पैशाची देवाणघेवाण झाली नाही. फक्त मैत्रीसाठी महिलेने किडणी दिली आहे.

Trending