आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्‍नीच्‍या मृत्‍यूनंतर आठवडाभर मृतदेहासमोर बसून होता Paralysed पती, भाऊ आल्‍यानंतर झाले अंतिमसंस्‍कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकच्‍या करवाड शहरामध्‍ये एक अतिशय वेदनादायी घटना समोर आली आहे. पतीला अर्धांगवायू झाला असल्‍याने मृत पत्‍नीसमोर तो तब्‍बल 7 दिवस नूसताच बसून होता. चालण्‍याबोलण्‍यात असमर्थ असल्‍याने कोणालाही या घटनेची माहिती ते देऊ शकले नाही. रविवारी पत्‍नीचा भाऊ घरी आला तेव्‍हा ही घटना समोर आली. व त्‍यानंतर मृत पत्‍नीचा अंतिम संस्‍कार करण्‍यात आला. अनेक दिवस काहीही न खाण्‍यापिण्‍यामुळे अर्धांगवायूने ग्रस्‍त पतीची तब्‍येतही फार खराब झाली होती. नंतर त्‍यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. या दाम्‍पत्‍याला कोणतेही अपत्‍य नाही. घरी ते दोघेच राहत असे.


आनंद कोलकर (60) आणि पत्नी गिरिजा कोलकर (55) असे या वृद्ध दाम्‍पत्‍याचे नाव आहे. जवळपास 7 दिवसांपूर्वी गिरीजा यांचा ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याने मृत्‍यू झाला होता. त्‍यावेळी पती आनंद कोलकर हे खुर्चीवर बसलेले होते.


बहिणीचा फोन आला नाही, म्‍हणून भाऊच आला घरी
बरेच दिवस बहिणीचा फोन न आल्‍याने गिरीचाचे भाऊ सु्ब्रम्‍हण्‍या मदिवाल त्‍यांना रविवारी भेटण्‍यासाठी गेले होते. मात्र बराचवेळ दरवाजा न उघडल्‍यामुळे त्‍यांनी टेरेसवर जात आत डोकावून पाहिले तेव्‍हा आनंद आणि गिरिजा दोघेही खुर्चीवर बसलेले त्‍यांना आढळले. मदिवाल यांनी सांगितले की, 10 वर्षांपूर्वी आनंद हे अर्धांगवायूचे शिकार झाले होते. गिरीजा घरखर्च तसेच आपल्‍या पतीच्‍या उपचाराच्‍या खर्चासाठी आसपासच्‍या घरांमध्‍ये काम करत असे. 

बातम्या आणखी आहेत...