आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • कर्नाटक विशेष: कमी आमदार असूनही हे नेते बनले मुख्यमंत्री, तर यांना गमवावे लागले पद Karnataka Like Situations When Chief Ministers Were Failed To Prove Majority

कर्नाटकी पेचापूर्वीचे प्रसंग- कमी आमदार असूनही हे नेते बनले मुख्यमंत्री, तर यांची गेली खुर्ची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले की, कर्नाटकी जनतेने कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत दिले नाही. 104 जागा जिंकल्यानंतर भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. तथापि, काँग्रेस आणि जेडीएसने 117 आमदारांच्या समर्थनार्थ दावा सादर केला होता, परंतु राज्यपालांनी भाजप सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता येदियुरप्पा यांच्यासमोर सर्वात मोठे संकट सदनात विश्वासमत मिळवण्याचे आहे. जर ते बहुमत मिळवण्यात अयशस्वी ठरले, तर त्यांना आपल्या पदावरून राजीनामा द्यावा लागेल. तथापि, असे पहिल्यांदा घडत नाहीये जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्याला या प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत असेल. यापूर्वीही काही दिवसांसाठीच सरकार बनलेले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सरकारांबाबत सांगत आहोत, जे आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.


1) 

2017 मध्ये झालेल्या मणिपूर निवडणुकीदरम्यान काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, परंतु येथे भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले. भाजपने एनपीएफचे 4, एनपीपीचे 4 आणि लोजपाच्या एका सदस्याच्या समर्थनाने सत्ता स्थापन केली आणि बीरेन सिंह यांना मुख्यमंत्री बनवले. 

2) 

2017 मध्ये काँग्रेसला 17 आणि भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या. तरीही भाजपचे मनोहर पर्रीकर यांना सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले. येथे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आणि त्यांनी एमजीपी, जीपीएफ आणि इतर पक्षांच्या समर्थनाने सत्ता स्थापन केली. 

3)

2016 मध्ये तत्कालीन राज्यपाल सय्यद सिब्ते रझी यांनी झारखंडमध्ये शिबू सोरेन यांना सरकार बनवण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यांनी काँग्रेसच्या समर्थनाने 10 दिवसांचे सरकार बनवले, कारण सदनात त्यांना पुरेसे विश्वासमत मिळू शकले नव्हते. यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

4)

सन 2013 मध्ये दिल्लीचे तत्कालीन उप-राज्यपाल नजीब जंग यांनी बहुमत सिद्ध न करू शकण्याची स्थिती पाहून भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देण्यास नकार दिला होता. त्यांनी राज्यातील सर्वात मोठा पक्ष आम आदमी पार्टीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. त्यांनी 28 डिसेंबर 2013 रोजी काँग्रेसच्या समर्थनाने सत्ता स्थापन केली आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री बनले.

5)

सन 1996 मध्ये उत्तर प्रदेशात भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही फक्त 39 जागा घेऊन सरकार बनवू शकले नाही. त्या वेळी कल्याण सिंहांनी 67 जागा जिंकणाऱ्या बहुजन समाज पक्षाला आपले समर्थन दिले आणि 6-6 महिन्यांसाठी मुख्यमंत्रिपदाची अट घालून मायावतींना मुख्यमंत्री बनवले. परंतु, ही आघाडी जास्त दिवस टिकू शकली नाही, 6 महिन्यांनीच काडीमोड झाला. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज व माहिती...

बातम्या आणखी आहेत...