आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर सोशलवर राहुल यांची उडवली जात आहे खिल्ली Karnataka Verdict 2018 Rahul Gandhi Trolled On Social Media After Loosing

काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर सोशलवर राहुल यांची उडवली जात आहे खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - कर्नाटक निवडणुकीचे निकाल येताच सोशल मीडियावर पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्रोल केले गेले. युजर्सनी वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधींना जबाबदार असल्याचे म्हटले आहे.  सकाळी 9 नंतर मतमोजणीचा कल भाजपकडे झुकू लागल्यावर सोशल मीडियावर काँग्रेसची खिल्ली उडवणे सुरू झाले.

अनेक युजर्सनी मजेदार कॉमेंट्स शेअर केल्या आहेत, यात चित्रपटांच्या पोस्टर्सचा वापर करत लिहिले की, राहुल यांना पंतप्रधानपदासाठी कमीत कमी 30 वर्षांचा काळ जाऊ द्यावा. अख्ख्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक रणनीतीचे कौतुक सुरू होते. कर्नाटक निवडणुकीच्या पराभवासाठी जेवढे राहुल गांधींना जबाबदार मानण्यात येत आहे, तेवढेच माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनाही मानले जात आहे. काही युजर्सनी बदामी विधानसभेसाठी लिहिले आहे की, बहुधा सिद्धारमैया हे लाथ मारल्याशिवाय बदामी सोडणार नाहीत.

काँग्रेससाठी ही निवडणूक निराशाजनक राहिली, कारण राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक होती, ज्यात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, कारण कर्नाटक आणि पंजाब हीच दोन मोठी राज्ये काँग्रेसकडे उरली होती. यात कर्नाटकही त्यांच्या हातातून गेले. आता फक्त पंजाब, पुद्दुचेरी आणि मिझोराममध्येहच काँग्रेस आहे. यात मिझोराममध्ये याच वर्षी निवडणुका होऊ घातल्या आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, सोशलवरील अशाच काही Funny रिअॅक्शन्स... 

बातम्या आणखी आहेत...