आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार; आतापर्यंत 211 दहशतवादी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीरमध्ये यावर्षी एन्काऊंटरमध्ये 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. (फाइल) - Divya Marathi
काश्मीरमध्ये यावर्षी एन्काऊंटरमध्ये 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. (फाइल)

श्रीनगर- उत्तर काश्मीरच्या हंदवाडा भागात सोमवारी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले, तर चकमक सुरू असताना एका महिलेस गोळी लागल्याने तिचा मृत्यू झाला. या वर्षी काश्मिरात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आतापर्यंत २११ दहशतवाद्यांना यमसदनास पाठवण्यात आले. दरम्यान, नौशेरा भागातही रविवारी सायंकाळी पाक लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात एक जवान जखमी झाला.  


लष्कर व पोलिसांनी एक विशेष मोहीम आखली असून दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावरून उंसू भागात शोधमोहीम सोमवारी सुरू ठेवली. या भागात कडाक्याची थंडी व पाऊस पडत असतानाही जवानांनी या परिसरातील मुख्य मार्ग रविवारी रात्री रोखून धरले. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी स्वयंचलित बंदुकातून अंदाधंुद गोळीबार सुरू ठेवला होता. जवानांनी या गोळीबारास जोरदार प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना ठार मारले. पोलिस महासंचालक एस. पी. वेद यांनी सांगितले की, ठार करण्यात आलेले दहशतवादी पाकिस्तानी होते. त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडला.  

 

दहशतवाद्यांनी २  बँक सुरक्षा रक्षकांना केले ठार  
दहशतवाद्यांनी शोपिया जिल्ह्यातील जम्मू अँड काश्मीर बँकेच्या वाहनावर सोमवारी दुपारी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात बँकेचे दोन सुरक्षा रक्षक ठार झाले. गोळीबारानंतर दहशतवादी पळून गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.


यावर्षी 211 दहशतवाद्यांना कंठस्नान 
- दहशतवाद्यांना सुरक्षित वातावरण मिळण्याआधीच त्यांना ठार मारण्यासाठी यावर्षी हिवाळ्यातही भारतीय सैन्याने ऑपरेशन ऑल आऊट राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 
- आयजी जुल्फिकार यांनी सांगितले की, यावर्षी हिवाळ्यात ऑपरेशनचा वेग कमी होण्याऐवजी अधिक वाढेल. गुजरात निवजडणूक संपल्यानंतर सीआरपीएफतडे काश्मीरमधील कारवाईसाठी अदिक जवान असतील. 
- सुत्रांच्या मते, सीआरपीएफचे सुमारे 5,000 जवान डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काश्मीरला पोहोचतील. 
- यावर्षी सिक्युरिटी फोर्सेसच्या कारवाईत जे 211 दहशतवादी मारले गेले त्यापैकी 40 दहशतवादी डिस्ट्रीक्ट कमांडर किंवा त्यापेक्षा वरच्या लेबलचे होते. यापैकी अनेक दहशतवादी चार-पाच वर्षांपासून अॅक्टीव्ह होते. साधारणपणे दहशतवाद्यांनी शस्त्र हाती घेतले की, 2-3 वर्षांपेक्षा अधिक काळ ते जगत नाहीत. पण काश्मीर पोलिस तरुणांबाबत बरीच नरमाईची भूमिका घेत आहेत. 
- श्रीनगरचे आयजी मुनीर खान यांच्यामते, दहशतवादाच्या मार्गावर गेलेल्यांनी फार गंभीर गुन्हा केलवेला नाही. त्यांना घरी परतण्याची संपूर्ण संधी दिली जात आहे. या मुलांना ठाण्यात जाण्याचीही गरज नाही, थेट घरी जा असेही सांगण्यात आले आहे. या मुलांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशीही केली जाणार नाही. खान म्हणाले, माफी म्हणजे माफीच. 


टेरर फंडिंगमध्ये 40 हून अधिक जणांवर कारवाई, दगडफेक झाली कमी 
- काश्मीरमध्ये तैनात असलेले सुरक्षा अधगिकारी यांच्या मते, टेरर फंडिंगमध्ये सहभागी असलेल्यांची लगाम खेचल्याने दगडफेक मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. एनआयएने काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने अशा बँक अकाऊंटची माहिती मिळवली, ज्यात नेहमी विदेशातून पैसा येत होता. अशा 40 हून अधिक खात्यांना सील करण्यात आले आहे. हा पैसा कृषी उत्पादन किंवा इतर सामानाच्या एक्सपोर्टच्या मोबदल्यात पाठवल्याचे दाखवले जात होते. 
- फंडिंगमध्ये सहभागी असलेले बहुतांश लोक पांढरपेशे होते आणि त्यांच्या ओव्हर ग्राऊंड कॅडरच्या मदतीने ते दगडफेकीसाठी पैसा पाठवत होते. यापैकी बहुतांश लोक काश्मीरच्या बाहेरच्या तुरुंगांत पाठवले असल्याने सहजपणे येणारा पैसा थांबला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...