आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर : लष्करावर दगडफेक, गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी संतप्त जमावाने लष्करावर जोरदार दगडफेक केली. सुरक्षा दलांनी जमाव पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यात १६ वर्षांच्या मुलीसह ३ जण ठार झाले.


हवुरा मिशिपोरामध्ये लोकांनी लष्कराच्या गस्ती पथकावर दगडफेक सुरू केली. दरम्यान, हैदरपोरा भागात अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर ग्रेनेड्सचा मारा केला. यात एक जवान गंभीर जखमी झाला आहे. हिजबुलचा अतिरेकी बुरहान वानीचा रविवारी दुसरा मृत्युदिन आहे. फुटीरवाद्यांनी खोऱ्यात बंदची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर तेथे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत इंटरनेटसह इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यासिन मलिकला शुक्रवारीच अटक करण्यात आली होती. सय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारुख यांना नजरकैदेत ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...