आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेटी बचाओ'चे अॅम्बेसेडर बिग बी म्हणाले-कठुआ गँगरेप घृणास्पद, चर्चाही भीतीदायक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चनने अखेर या प्रकरणावरील मौन सोडले. -फाइल - Divya Marathi
अमिताभ बच्चनने अखेर या प्रकरणावरील मौन सोडले. -फाइल

मुंबई - कठुआ गँगरेप घृणास्पद असल्याचे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कॅम्पेनचे अॅम्बेसेडर अमिताभ बच्चन म्हणाले आहेत. या विषयावर चर्चा केली तरी मला दुःख होते, मला त्याची घृणा वाटते. त्यामुळे तो प्रश्न उकरून काढू नका. याबाबत बोलणेही भयावह आहे, असे एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले.

 

या विषयावर यापूर्वीच अनेक प्रसिद्द बॉलिवूड सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केला आहे. जम्मूच्या कठुआमध्ये बकरवाल समुदायाच्या एका 8 वर्षीय चिमुरडीचे अत्यंत निर्घृणपणे लैंगिक शोषण करण्यात आले होते. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला होता. आरोपपत्रात या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचाराची माहिती समोर आली होती. 


साँग लाँचच्या कार्यक्रमात बोलले बिग बी 
न्यूज एजन्सीजच्या मते अमिताभ बच्चन (75) यांना कठुआबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया केली. गुरुवारी अमिताभ आणि ऋषी कपूर यांच्या '102 नॉट आऊट'च्या साँग लाँचिंगच्या वेळी ते मीडियाशी बोलले. त्यावेळी अमिताभने गँगरेपच्या घटनेबाबत आपले म्हणणे मांडले. 


श्रीनगरमध्ये शाळा बंद 
दरम्यान, श्रीनगरमध्ये गँगरेप पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी श्रीनगरमध्ये आंदोलन केले. त्यामुळे सरकारने अनेक शाळा महाविद्यालये बंद टेवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी श्रीनगर, बारामुल्ला, पुलवामासह काश्मीरच्या 6 जिल्ह्यांत आंदोलन करत आहेत. सोपोरमध्ये सुरक्षारक्षक आणि आंदोलकांमध्ये वादाचे प्रकारही पाहायला मिळाले. 

बातम्या आणखी आहेत...