आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुआ गँगरेप: मेहबुबांचे हायकोर्टाच्या चीफ जस्टिसना पत्र, फास्ट ट्रॅक कोर्टाची केली विनंती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्य सरकारने या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.- फाइल - Divya Marathi
राज्य सरकारने या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.- फाइल

जम्मू - कठुआ गँगरेप प्रकरणाच्या सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची विनंती मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीर हायकोर्टाचया मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. 90 दिवसांत हे कोर्ट सुनावणी पूर्ण करेल. राज्यातील अशाप्रकारचे हे पहिलेच कोर्ट असेल. तसेच राज्य सरकारेन या प्रकरणातील आरोपी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णयही केला आहे. दुसरीकडे या प्रकरणी राजीनामा देणारे भाजपचे मंत्री लाल सिंह यांनी पलटी मारली आहे. आरोपींच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलो होतो, असे ते म्हणाले. 


काय म्हणाले, लाल सिंह 
>> भाजप नेते चौधरी लाल सिंह यांनी कठुआ गँगरेप आणि हत्येच्या आरोपींच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीमध्ये परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी गेलो होतो असे म्हटले. 
>> कठुआ घटनेनंतर वाढलेल्या दबावामुळे लाल सिंह आणि चंदर प्रकाश गंगा यांनी शुक्रवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 
>> आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत, आम्ही त्यांचेही ऐकायचे नाही का, असे लालसिंह म्हणाले. 
>> राम माधव यांनीही त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. ते लोकांना शांत करण्यासाठी गेले होते. तपासावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न नव्हता असे माधव म्हणाले. 


संयुक्त राष्ट्रांत पोहोचले प्रकरण 
कठुआ गँगरेप आणि हत्या प्रकरण संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचले आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेश यांनी ही घटना भयावह असल्याचे सांगत, लवकरच अधिकारी पीडितेला न्याय मिळवून देतील अशी आशा व्यक्त केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...