आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदारनाथनंतर बद्रीनाथचेही कपाट उघडले, लेझर शाेतून शिवमहिम्याचे दर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - हर हर महादेवच्या जयघाेषात अाणि मंत्राेच्चारात केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात अाले. त्यानंतर दिवसभर दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी हाेती. यंदा प्रथमच मंदिरावर लेझर शाेद्वारे शिवमहिम्याचे दर्शन भाविकांना घडवून देण्यात अाले. बद्रीनाथ मंदिराचे कपाट साेमवारी (दि. ३०) पहाटे ४ वाजता उघडण्यात अाले.


बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख ज्योतिर्लिंग आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिराच्या कपाट पूजनासाठी उत्तराखंडचे राज्यपाल के. के. पाैल,  मंदिराचे प्रमुख पुजारी भीमाशंकर रावल, गंगाधर लिंगा, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बी. डी. सिंग, नाशिकच्या कैलास मठाचे स्वामी संविदानंद महाराज अादी उपस्थित हाेते. वैदिक मंत्राेच्चारात मंदिराचे कपाट खुले करण्यात अाले. या निमित्ताने यमुनाेत्री, गंगाेत्री, केदारनाथ अाणि बद्रीनाथ या चार धामांची यात्रा सुरू झाली. 


केदारनाथला भाविक यंदापासून लेझर शाेचा अास्वाद घेत अाहेत. केदारनाथनंतर साेमवारी पहाटे बद्रीनाथ मंदिराचे कपाट मंत्रांच्या घाेषात उघडण्यात अाल्याची माहिती स्वामी संविदानंद सरस्वती यांनी दिली. केदारनाथला साेमवारी दिवसभर पाऊस हाेता. तर बद्रीनाथला मात्र कडाक्याच्या थंडीसह अाल्हाददायक वातावरण हाेते.

 

उत्तराखंडच्या राज्यपालांनी सर्वात आधी केले दर्शन 

- कपाट उघडल्यानंतर सर्वात आधी उत्तराखंडचे राज्यपाल केके पॉल यांनी दर्शन केले. त्यांच्याबरोबर विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद्र अग्रवालही उपस्थित होते. 
- त्यासर्वांनंतर भक्तांनी दर्शन केले. 


एका लाखांपेक्षा अधिक यात्रेकरुंची नोंदणी 
2013 मध्ये आलेल्या नैसर्गिक संकटानंतर केदारनाथ यात्रेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण यावेळी यात्रेबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. बदरी-केदार मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीडी सिंह यांनी सांगितले की, 25 एप्रिलपर्यंत केदारनाथसाठी एक लाख 10 हजार यात्रेकरूंनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे. त्यांनी सांगितले की, द्वार उघडण्याच्या दिवशी केदारनाथमध्ये पाच हजारांपेक्षा अधिक भाविक पोहोचले आहेत. 2013 च्या संकटानंतर ही पहिलीच वेल आहे जेव्हा द्वार उघडण्याच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने लोक आहे. चार धाम यात्रा सुरक्षित असल्याचा संदेश लोकांमध्ये गेल्याने भाविकांची संख्या वाढत असल्याचे ते म्हणाले. 


सर्व विक्रम मोडण्याची शक्यता 
बीकेटीसीच्या आकडेवारीनुसार वर्ष 2017 मध्ये 4.09 लाख बाविकांनी गंगोत्री, 3.92 लाख बाविकांनी यमुनोत्री आणि 4.71 लाख लोकांनी केदारनाथ आणि 8.85 लाख लोकांनी बद्रीनाथ धामाचे दर्शन केले. उत्तराखंड सरकारने यावर्षी भाविकांचा आकडा 30 लाखांवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून 2013 मधील नैसर्गिक संकटानंतर भाविकांच्या संख्येचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. 

 

पुढील स्लाईडवर वाचा, लेझर शो बाबद सविस्तर माहिती ....

बातम्या आणखी आहेत...