आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kedarnath's Cupboard Will Be Opened In The Cold And Rainy Season; Closed For Six Months

थंडी-पावसात केदारनाथचे कपाट अाज उघडणार; सहा महिन्यांसाठी बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केदारनाथ - महाराष्ट्रातील नाशिकसह असंख्य शहरांच्या तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसच्या वर गेलेला असताना दुसरीकडे केदारनाथ मंदिर परिसरात मात्र भाविक 
थंडीने हुडहुडले अाहेत. दाेन दिवस जाेरदार पाऊस झाला असून जनजीवन विस्कळीत झाले अाहे. असे असतानाही प्रशासनाने केदारनाथ मंदिराचा कपाट उघडण्याचा  सोहळा पूर्णत्वास नेण्याची तयारी केली अाहे.

 

रविवारी (दि. २९) सकाळी ६.१५ वाजता खुले हाेणार अाहेत. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार धामांची यात्रा यानिमित्ताने सुरू 
होत आहे. थंडीत अाणि जाेरदार पावसातही केदारनाथच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी हाेत अाहे. या मंदिराच्या कपाटपूजनासाठी उत्तराखंडचे राज्यपाल के. के. पाैल,  मंदिराचे प्रमुख पुजारी भीमाशंकर रावल, गंगाधर लिंगा, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बी. डी. सिंग, नाशिकच्या कैलासमठाचे स्वामी संविदानंद सरस्वती अादी उपस्थित राहणार अाहेत. रविवारी वैदिक मंत्राेच्चारात मंदिराचे कपाट खुले हाेणार अाहेत.


यंदा लेसर शाे 

शनिवार (दि. २८) पासून हा लेसर शाे सुरु करण्यात अाला असून पुढील सात दिवस ताे भाविकांना बघता येईल.

 

कपाट सहा महिन्यांसाठी बंद
उत्तराखंडमध्ये हिवाळ्यात बर्फ पडायला लागताे, सुमारे दहा-बारा फूट उंचीपर्यंत बर्फ साचत असल्याने केदारनाथ अाणि बद्रीनाथ मंदिरांचे दरवाजे, ज्याला स्थानिक भाषेत कपाट म्हणतात ते सहा महिन्यांसाठी नोव्हेंबरमध्ये बंद हाेतात. केदारनाथचे मंदिर केव्हा उघडणार याची तारीख महाशिवरात्रीच्या दिवशी जाहीर केली जाते. केदारनाथ यात्रा सुरू हाेण्याची तारीख शिवरात्रीला जाहीर होते. येत्या ९ नाेव्हेंबरला केदारनाथचे कपाट बंद करण्यात येतील.

 

भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

केदारनाथच्या अापत्तीनंतर काही वर्षे पर्यटक व यात्रेकरूंची संख्या अत्यल्प राहिली. मात्र, अाता झपाट्याने वाढ हाेऊ लागली अाहे. दरडी काेसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता जेथे असते, अशा ठिकाणांवर दरडी हटवणारी यंत्रे चाेवीस तास तैनात अाहेत. तर, यात्रेकरूंच्या सुरक्षेकरिता जवानांच्या तुकड्या सज्ज अाहेत. पूर्वीच्या अवघड चढणीच्या रस्त्यांएेवजी अाता कमी वळणाचा माेठा रस्ता बांधण्यात अाला अाहे. हेलिकाॅप्टरद्वारे भाविकांची सेवा रविवारपासून सुरू हाेणार अाहे. या प्रवासासाठी अाकारण्यात येणाऱ्या शुल्कावर सरकारचे नियंत्रण असते.

 

भगवंताच्या दर्शनासाठी अास
भगवंताच्या दर्शनासाठी श्रद्धाळू अतिशय उत्सुक अाहेत. उत्तराखंड सरकारने यात्रेसाठी उत्तम व्यवस्था केली अाहे. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात अाल्याचे   दिसते. हिंदू भाविकांनी केदारनाथची यात्रा केलीच पाहिजे. महाराष्ट्रासह भारतात सुख-शांती नांदण्यासाठी केदारनाथला मी प्रार्थना करणार अाहे. 
- स्वामी संविदानंद सरस्वती, कैलास मठ, नाशिक

बातम्या आणखी आहेत...