आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोराचे Emotional Letter वाचून भावूक झाले पोलिस; बंद केली चोरीची चौकशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - केरळच्या अलापुझा येथे एका चोराने चोरीच्या दुसऱ्याच दिवशी त्या घरात येऊन सर्व साहित्ये परत केल्याची घटना घडली आहे. चोराने सोने, चांदीच्या दागिन्यांसह इतर वस्तू परत देताना एक पत्र सुद्धा सोडले. या पत्रात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच सर्वांची माफी मागितली. हा पत्र वाचून घराचे मालक आणि पोलिस भावूक झाले. यानंतर त्यांनी चोरीची चौकशी बंद करण्याचा निर्णय घेतला. 


लग्नात गेले होते कुटुंबीय
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, अलापुझा येथे राहणारे मधु कुमार आपल्या कुटुंबासह एका लग्नात गेले होते. त्याचवेळी ते घराचा मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यास विसरले होते. रात्री 10.30 वाजता ते घरी पोहोचले तेव्हा घरातील सर्वच सामान अस्त-व्यस्त पडलेले होते. दार उघडे आणि सोन्याचे दागिने लंपास झाले होते. कुमार यांनी वेळीच पोलिसांना फोन लावून घटनास्थळी बोलावले आणि तपास सुरू झाला. त्यांनी एका व्यक्तीवर संशय असल्याचे पोलिसांना सांगितले.

 
दुसऱ्याच दिवशी परत केले चोरलेले साहित्य
चोरी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मधु कुमार यांना आपले दागिने आणि मोल्यवान वस्तू परत सापडल्या. या वस्तू पोलिसांनी शोधून काढलेल्या नाही तर स्वतः चोराने त्यांना परत केल्या. तो घरात आला आणि एका कपड्यात चोरलेल्या वस्तू आणि एक लेटर सोडून गेला. त्यामध्ये चोराने माफी मागितली होती. सोबतच, यापुढे चोरी करणार नाही असे त्याने लिहिले. चोरीसाठी त्याने एक इमोशनल कारण सुद्धा मांडले. हे पत्र वाचून कुमार वेळीच पोलिस स्टेशनला गेले आणि त्यांनाही सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर पोलिसांनी घरमालकाच्या आग्रहावरून हा तपास बंद करण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...