आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नमाजपासून रोखले नाही, जागा नसेल तर खासगी जागेचा वापर करा : मुख्यमंत्री खट्टर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदु संघटनांच्या विरोधानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी रविवारी नमाजबाबत वक्तव्य केले होते. - फाइल - Divya Marathi
हिंदु संघटनांच्या विरोधानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी रविवारी नमाजबाबत वक्तव्य केले होते. - फाइल

नवी दिल्ली - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्‌टर यांनी सार्वजनिक ठिकाणी नमाजाच्या संदर्भातील वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी कधीच कोणाला नमाजपठणापासून अडवण्याबाबत बोललो नाही. जर जागा कमी पडत असेल तर खासगी जागेचा वापर करता येईल. याआधी मुख्यमंत्री खट्टर यांनी म्हटले होते की, नमाज पठण हे केवळ मशीद आणि ईदगाहमध्येच व्हायला हवे. गेल्या शुक्रवारी गुडगांवमध्ये हिंदु संघटनांच्या काही लोकांनी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या नमाजमध्ये अडथळा निर्माण केल्याचे समोर आले होते. त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 


आज अडवले नाही तर लोक हक्क मागतील : खट्टर
- मुख्यमंत्री रविवारी चंदिगडमध्ये म्हणाले होते की, नमाज सार्वजनिक ठिकाणांऐवजी केवळ मशीद किंवा ईदगाहमध्ये व्हायला हवी. सध्या उघड्यावर नमाज पठनाचे प्रकार वाढले आहेत. आजच याला आळा घातला नाही तर उद्या त्या जागेवर मालकी हक्क मागून आम्ही अनेक वर्षांपासून येथे नमाज पठन करत आहोत, असे म्हणतील.  
- मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर ते रविवारी इस्रायल आणि युकेच्या 10 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 


खट्टर यांचे स्पष्टीकरण 
- वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर मुख्यमंत्री खट्‌टर म्हणाले की, आमच्या मते, नमाज मशीद किंवी ईदगाहमध्ये व्हायला हवे. जर जागा नसेल तर त्यासाठी वैयक्तीक मालकीच्या जागेचा वापर करता येईल. राज्यार कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारवर आहे. 
- खट्टर म्हणाले की, जर कोणाला सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणामुळे काही अडचण निर्माण झाली तर त्यांनी पोलिस किंना प्रशासनाला सूचना द्यावी. जोपर्यंत कोणाला त्रास होत नव्हता तोवर काहीच अडचण नव्हती. पण कोणाला त्यामुळे त्रास होत असेल तर आपण सतर्क राहायला हवे. 

 

बातम्या आणखी आहेत...