आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस सिलिंडरवर लिहिलेल्या या नंबरचा काय असतो अर्थ, 99% लोकांना माहिती नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - गॅस सिलिंडरचा घरोघरी वापर केला जातो. त्यामुळे ही माहिती सर्वांना असायलाच हवी. आपण नेहमी एजन्सीतून गॅस सिलिंडर आणतो वा तो आपल्याला घरपोहोच होतो. परंतु, गॅस सिलिंडरवर असलेल्या नंबरबाबत तुम्हाला किती माहिती आहे? 

 

गॅस सिलिंडरची एक्स्पायरी डेट...

तुम्ही गॅस सिलिंडर जो नंबर पाहतात तो वास्तवात सिलिंडरची एक्स्पायरी डेट असतो. स्वयंपाकघरात येणाऱ्या गॅस सिलिंडरवर एजन्सीद्वारे हा नंबर लिहिला जातो. त्याला सिलिंडरची एक्स्पायरी डेट म्हणून ओळखतात. जेणेकरून एजन्सीचा कर्मचारी वा सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्याला सहज समजून येईल. परंतु, सर्वसाधारण ग्राहकाला हे समजणे बऱ्याचदा कठीण होऊन बसते. जर तुमच्यासोबतही असेच होत असेल तर तुम्ही हा नंबर म्हणजेच एक्स्पायरी डेट जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला कुणी एक्स्पायर झालेला सिलिंडर देणार नाही.


केव्हा एक्स्पायर होणार हे कसे ओळखाल?
हे खूप सोपे आहे. हे समजल्यावर गॅस सिलिंडर फुटण्याचा वा लीक होण्याच्या टेन्शनपासून तुम्ही मुक्त व्हाल. सिलिंडरच्या सर्वात वर रेग्युलेटरच्या जवळ ज्या 3 पट्ट्या असतात, त्यावर काही नंबर आणि इंग्रजी अक्षरे असतात. 
त्यात एकीवर  A, B, C, D लिहिलेले असते. समजून घेण्यासाठी वर्षाच्या 12 महिन्यांची या 4 इंग्रजी अक्षरांमध्ये विभागणी करू. म्हणजेच एका अक्षरासाठी 3 महिने. A चा अर्थ आहे जानेवारी ते मार्च आणि B चा अर्थ एप्रिल ते जूनपर्यंत असा असतो. त्याचप्रमाणे C जुलै ते सप्टेंबर आणि  D चा अर्थ ऑक्टोबर ते डिसेंबर असा होईल.

 

वेळीच एक्स्पायरी ओळखा अन् धोका टाळा
या अल्फाबेटसोबतच वर्षही लिहिले जाते. उदाहरण म्हणून  A-17 चा अर्थ आहे की गॅस सिलिंडरची एक्स्पायरी डेट जानेवारी ते मार्च 2017 पर्यंत आहे. आणि यानंतर सिलिंडरचा वापर करणे धोकादायक आहे. या धोक्यांमध्ये सिलिंडरमधून गॅस लिकेज किंवा सिलिंडरचा विस्फोटही सामील आहे.

इंग्रजी अल्फाबेटनंतर लिहिलेला आकडा हा एक्स्पायरीच्या वर्षाला दर्शवतो. उदा. 19 चा अर्थ 2019 आहे. त्याचप्रमाणे 20 चा अर्थ 2020. म्हणजेच तुमच्या घरात जर C-17 लिहिलेला सिलिंडर असेल, तर तो एक्स्पायर्ड आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...