आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • स्कूल व्हॅनला रेल्वेची भीषण धडक, 13 शाळकरी मुलांचा मृत्यू, Kushinagar Rail And School Van Accident Several Students Died News And Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपी : स्कूल व्हॅन-रेल्वेची धडक; १३ मुलांचा मृत्यू, इअरफोन लावून गाणी ऐकत होता व्हॅनचा चालक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत सर्व शाळकरी विद्यार्थी याच स्कूल व्हॅनमध्ये स्वार होते. - Divya Marathi
मृत सर्व शाळकरी विद्यार्थी याच स्कूल व्हॅनमध्ये स्वार होते.

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या कुशीनगरात मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला रेल्वेची धडक बसली. यात १३ मुलांचा मृत्यू झाला. पैकी ७ भाऊ-बहीण होते. ७ मुले जखमी आहेत. जखमींनी सांगितले की, चालक कानात इअरफोन लावून गाणी एेकत व्हॅन चालवत होता. त्याला रेल्वेचा आवाज ऐकू आला  नाही. मुले व फाटकाजवळील लोकांनी जोरात आवाज देऊन त्याला इशारा केला होता. गुरुवारी सकाळच्या या अपघातात चालक गंभीर जखमी आहे. व्हॅनमध्ये २० मुले होती.

बुलेट ट्रेनच्या १७% खर्चातच देशात  विनाफाटक क्रॉसिंग बंद होणे शक्य

* मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर १.०८ लाख कोटी रु. खर्च होतील. रेल्वे खात्यानुसार एका मानवरहित क्रॉसिंगवर कर्मचारी नियुक्तीस ५० लाख रु. लागतात. देशात ३४७९ मानवरहित क्रॉसिंग आहेत. ते संपुष्टात आणण्यासाठी १७ हजार कोटी रुपये खर्च होतील.
* या क्रॉसिंगच्या ए, बी, सी, डी अशा ५ श्रेणी आहेत. ए, बी, सी यांना ३० जूनपर्यंत कर्मचारी देण्याची घोषणा आहे. डी आणि ई क्रॉसिंगना २०२० पर्यंत कर्मचारी देण्यात येणार आहे.

 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भीषण अपघाताचा फोटो...   

बातम्या आणखी आहेत...