आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लेडी कॉन्स्टेबलचा व्हिडिओ झाला व्हायरल, मृत्यूपूर्वीच हे केले होते रेकॉर्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या सरोजच्या जिवाला धोका होता. - Divya Marathi
महिला पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या सरोजच्या जिवाला धोका होता.

जोधपूर/ओसियां - पोलिस आयुक्तालयातील महिला पोलिस स्टेशनमध्ये तैनात एका महिला काँस्टेबलचा मृतदेह बुधवार संध्याकाळी तिच्याच घरात पंख्याला लटकलेला आढळला. काही दिवसांपूर्वीच तिने स्वत: बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावरून ती एका तरुणावर प्रेम करत होती, परंतु घरचे तिच्याविरुद्ध होते आणि त्यांनी तिचे लग्न दुसरीकडे बळजबरी लावल्याचे दिसते. व्हिडिओत कॉन्स्टेबलने स्वत: आणि प्रियकराच्या जीवाला धोका असल्याचा संशयही व्यक्त केला होता.   

- ओसियां पोलिस स्टेशनचे नेमाराम म्हणाले, बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता माहिती मिळाली की, सिरमंडीत राहणाऱ्या संवताराम मेघवाल यांची कन्या सरोज मेघवालने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले आहे आणि दरवाजा उघडत नाहीये.
- यावर डीएसपी (ओसियां) सरदार दान यांच्यासह पोलिस पथकाने धाव घेतली. पोलिसांनी दार उघडल्यावर सरोज पंख्याला लटकलेली आढळली. रात्री पोलिसांनी मतृदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृत सरोजचा भाऊ राजेंद्र मेघवालच्या जबाबावरून प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

 

3 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, एकदाच गेली होती सासरी
- पोलिस चौकशीत कुटुंबीय म्हणाले की, सरोजचे लग्न ऑक्टोबर 2016 मध्ये भैंसर येथील रहिवासी पुखराज मेघवाल यांचा मुलगा भोमाराम याच्याशी झाले होते.
- लग्नानंतर ती फक्त एकदाच आपल्या सासरी गेली होती. कुटुंबीयांनी तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले, परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिच्या प्रेमसंबंधांची बाब समोर आली.

 

सरोजने मॉलमध्ये शूट केले होते स्वत:चे चार व्हिडिओ
- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले वीडियो सरोजने 2 नोव्हेंबर रोजी एका मॉलमध्ये शूट केले होते. यात सरोजने स्वत:ला पूर्ण शुद्धीत असल्याचे सांगून म्हटले की, मी हेमंत नावाच्या तरुणावर प्रेम करते.
- गत 27 ऑक्टोबरला तिच्यासमोरच तिचा भाऊ शिवलाल आणि काका पुखाराम यांनी हेमंत ऊर्फ गुड्डूला मारहाण करून गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

 

बळजबरी स्वाक्षरी घेऊन प्रियकराविरुद्ध केस दाखल केल्याचा आरोप...
- व्हिडिओनुसार, काका आणि भावाने तिला प्रियकर हेमंतविरुद्ध पोलिस तक्रारीवर बळजबरी स्वाक्षरी करायला लावली आणि रातानाडा पोलिस स्टेशनमध्ये तिला नेऊन गुन्हा दाखल करायला लावला. तथापि, पोलिसांनी सरोजच्या जबाबाच्या आधारे एफआयआरही दाखल केली होती.
- व्हिडिओत सरोजने स्वत:सोबत काही अनिष्ट होण्याचा संशय व्यक्त करत म्हटले की, तिच्या घरचे हेमंतलाही अडकवू शकतात.

 

10 जानेवारीला होणार होते कन्फर्मेशन, दोन दिवसांपूर्वी घरी गेली...
- सरोज जोधपूर पुलिस आयुक्तालयात 2015 बॅचची कॉन्स्टेबल होती आणि सध्या महिला पोलिस स्टेशनमध्ये तैनात होती.
- 10 जानेवारीलाच तिचे कन्फर्मेशनही होणार होते आणि ती दोन दिवसांपूर्वीच घरी गेली होती. बुधवारी संध्याकाळी सरोजने आपल्या आईला अंघोळीसाठी कपडे दिले. काही वेळाने आई अंघोळ करून बाहेर निघाली, तेव्हा घरातील सर्व दरवाजे आतून बंद होते. नंतर कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावले.

 

प्रियकर म्हणाला- 9 वर्षांपासून होते आमचे संबंध, सर्वांना माहिती होती...

- सरोजचा प्रियकर येथे भदवासियामध्ये परिहारनगरच्या रविदासनगरचे रहिवासी हेमंत मोहनपुरिया यांनी भास्करला सांगितले की, त्यांच्या घरासमोरच सरोजच्या काकाचे घर आहे. तेथेच दोघांची भेट 9 वर्षांपूर्वी झाली होती. येथून सुरू झालेली मैत्री प्रेमात बदलली.
- हेमंत म्हणाला की, याबाबत सरोजच्या पूर्ण कुटुंबाला माहिती होती.
- चार दिवसांपूर्वी 7 जानेवारीलाही सरोजने फोनवर म्हटले होते की, घरचे तिला जिवे मारतील. त्या दोघांचे बोलणे सुरू असताना तिथे तिचा भाऊ पोहोचला आणि त्याने फोन हिसकावून घेतला.
- हेमंत म्हणाला, सरोजचे काका पुखाराम जोधपूर आयुक्तालयात सब इन्स्पेक्टर आहेत, तर एक भाऊ शिवलाल हेड कॉन्स्टेबल और हरचंद कॉन्स्टेबल पदावर तैनात आहेत.
- हेमंतने आरोप केला की, सर्व घरच्यांनीच मिळून सरोजची हत्या करून याला आत्महत्येचे रूप दिले आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...