आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • बेवारस बाळाला दूध पाजणाऱ्या या महिला कॉन्स्टेबलने देशभरात होतेय कौतुक, मुख्यमंत्र्यांनीही केला गौरव Lady Cop Breastfed Abandoned Newborn Goes Viral On Social

Inspiring: बेवारस बाळाला दूध पाजणाऱ्या या महिला कॉन्स्टेबलने देशभरात होतेय कौतुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - भुकेने व्याकूळ होऊन रडत असलेल्या बेवारस बाळाला स्तनपान करणाऱ्या बंगळुरूच्या कॉन्स्टेबल अर्चना यांचे देशभरात कौतुक होते आहे. सोशल मीडियावर बहुतांश युजर्स अर्चना यांच्या वात्सल्याचे दाखले देत आहेत. तर काही जण इतर पोलिसांनाही महिला कॉन्स्टेबलच्या औदार्यापासून धडा घेण्याचा सल्ला देत आहेत. तथापि, अर्चना यांनी अबोध बाळाची भूक शमवणे ही स्वाभाविक बाब असल्याचे म्हटले आहे. 

 

काय म्हणतात अर्चना?
एका दैनिकाशी बोलताना अर्चना म्हणाल्या, 'मला वाटते की, बाळाला शांत करण्यासाठी हाच उपाय होता. त्या म्हणाल्या की, बहुधा बाळ काही मिनिटांपूर्वीच जन्मले असावे. जेव्हा मी पाहिले तेव्हा बाळ रडत होते आणि एक आई असल्याने त्याला भूक लागल्याची जाणीव मला झाली. मी त्याला स्तनपान करवले. यानंतर बाळाचे रडणे बंद झाले.'

 

5 महिन्यांच्या बाळाच्या आई
अर्चना यांनाही 5 महिन्यांचे बाळ आहे. त्यांनी मातृत्व रजेनंतर नुकतेच पुन्हा जॉइन केले होते. त्या म्हणतात, 'जेव्हा मी बाळाले पाजत होते, तेव्हा मला तो माझाच मुलगा वाटला. 32 वर्षीय अर्चना मागच्या 5 वर्षांपासून सॉफ्टवेअर पॉवर हाऊसजवळ बनलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सिटी पोलिस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत.

 

चहुकडून कौतुकाचा वर्षाव
कर्नाटकाचे नवनिर्वाचित मुख्‍यमंत्री एच. डी. कुमारस्‍वामी यांनी कॉन्स्‍टेबल अर्चना यांची प्रशंसा केली. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ही अर्चना यांची कौतुकास्पद कामगिरी आहे. याशिवाय कुमारस्‍वामींनी भेटण्याची इच्छाही जाहीर केली आहे. या बाळाचे नावही कुमारस्‍वामी ठेवण्यात आले आहे. अर्चना यांचे पतीही पत्नीच्या कामगिरीवर खूप खुश आहेत.

 

कुठे आढळले बाळ?
रिपोर्टनुसार, बांधकामाच्या जागेवर कोणीतरी नवजात बाळाला सोडून गेले होते. स्थानिकांनी बेवारस बाळाला पाहून पोलिसांना कळवले. माहिती समजताच पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा बाळाची अवस्था खूप वाईट होती. ते त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. उपचारांनंतर बाळाला पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले, तेथे अर्चना यांनी त्याला दूध पाजले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...