आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायमुनानगर- हरियाणातील यमुनानगरमध्ये शनिवारी बारावीच्या विद्यार्थ्याने शाळेतील मुख्याध्यापिकेची गोळी मारून हत्या केली. वडिलांच्या परवाना असलेल्या बंदुकीतून शिवांग गुंबरने पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी चार गोळ्या रितू छाबडा यांच्या छातीत लागल्या, तर एक गोळी भिंतीत घुसली. त्याला पकडण्यासाठी सेवक मागे धावला असता त्याच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या. बंदुकीतील गोळ्या संपल्यानंतर परिसरातील लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. हत्येचे कारण विचारल्यानंतर शिवांगने सांगितले की, मॅडम नेहमी परेशान करत होती, शनिवारी दुपारी १२ वाजता पालक-शिक्षक सभा असल्याने मुख्याध्यापिका पालकांकडे आपली तक्रार करतील या भीतीने आपण हे कृत्य केले.
१० जानेवारीला सज्ञान
शिवांग हा फायनान्सर रणजित ऊर्फ रजनीश गुंबर यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये शिकतो. येथे सातवी ते बारावीपर्यंतच्या वर्गात ३०० विद्यार्थी आहेत. शिवांग बारावी वाणिज्य शाखेत असून १० जानेवारीला तो सज्ञान झाला आहे.
बुलेट आणल्यास रागवत, धमकावत होत्या मॅडम
शाळेत प्रत्येक बाबतीत मॅडम नेहमी छळ करत होत्या. वडिलांनी दिलेली बुलेट शाळेत घेऊन आल्यास टोचून बोलायच्या. बोर्डाच्या परीक्षेत बसू देणार नसल्याची धमकीही त्यांनी दिली होती. पालक सभेमध्ये त्या पालकांकडे माझी तक्रार करतील याची भीती वाटल्याने मी त्यांची हत्या केली. गोळ्या झाडत होतो, पण किती गोळ्या झाडल्या गेल्या याची माहिती नाही, असे पकडले गेल्यानंतर शिवांगने सांगितले.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.