आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या अनुपस्थिती लालुंच्या मुलाचा साखरपुडा, ऐश्वर्या राय बनली यादवांची सून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव यांचा साखरपुडा बुधवारी झाला. 12 मे रोजी त्यांचा विवाह होणार आहे. त्यापूर्वी आज त्यांचा साखरपुडा उरकण्यात आला. लालूप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीतच तेजप्रतापला साखरपुडा उरकावा लागला आहे. तेजप्रताप यांचे लग्न ऐश्वर्याबरोबर होत आहे. 


तेजप्रतापची होणारी पत्नी ऐश्वर्या राय ही बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात आहे. तर राजदचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रिका राय यांची ती मोठी मुलगी आहे. लालूप्रसाद यादव तुरुंगात असले तरी, यादव आणि राय कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा समारंभ पार पडला. 

 

पुढे पाहा, तेजप्रतापच्या साखरपुड्याचे फोटोज आणि ऐश्वर्याबाबत काही माहिती...

बातम्या आणखी आहेत...