आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • या महान क्रांतिकारकाचा आजही सुरक्षित आहे मृतदेह Legendary Russian Leader Vladimir Lenin Birthday Special Story

या महान क्रांतिकारकाचा आजही सुरक्षित आहे मृतदेह, 94 वर्षांपासून केले जातेय जतन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेनिन यांचा मृत्यू होऊन 94 वर्षे झाली. परंतु आजही त्यांचा मृतदेह संरक्षित आहे. - Divya Marathi
लेनिन यांचा मृत्यू होऊन 94 वर्षे झाली. परंतु आजही त्यांचा मृतदेह संरक्षित आहे.

नवी दिल्ली - नुकतेच त्रिपुरामध्ये रशियन क्रांतीचे महान नायक व्लादिमीर लेनिन यांची मूर्ती पाडण्यात आली. आरोप आहे की, भाजप समर्थकांनी बुलडोझरच्या मदतीने लेनिन यांची मूर्ती पाडली. यामुळे डावे पक्ष आणि त्यांचे समर्थक नाराज झाले. 22 एप्रिल हा या महान क्रांतिकारकाचा जन्मदिन आहे. यानिमित्त DivyaMarathi.Com व्लादिमीर लेनिन यांच्याविषयी ही खास माहिती देत आहे. 

 

खरे नाव नव्हते लेनिन!
रशियाच नव्हे तर जगाच्या इतिहासात लेनिन यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. जागतिक राजकारणाला त्यांनी एक नवा रंग दिला. रशियाला क्रांतीचा मार्ग दाखवून सत्तेपर्यँत पोहोचवण्यात व्लादिमीर लेनिन यांचा सिंहाचा वाटा होता. व्लादिमीर इलीइच उल्यानोव हे त्यांचे खरे नाव होते.  
त्यांचा जन्म 22 एप्रिल 1870 रोजी वोल्गा नदीच्या काठी वसलेल्या सिम्ब्रिस्क शहरात झाला. लेनिन यांचे वडील शाळांमध्ये निरीक्षक होते. सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबात जन्मलेले ब्लादिमीर नंतर जगभरात लेनिन नावाने प्रसिद्ध झाले.

 

अभ्यासात हुशार, क्रांतिकारी विचाराधारा
लेनिन शालेय जीवनात हुशार होते. पदवी घेतल्यावरही लेनिन यांनी 1887 मध्ये कजान विद्यापीठाच्या विधी विभागात प्रवेश घेतला. तेथे त्यांच्यावर क्रांतिकारी विचारधारेचा प्रभाव पडला. एकदा विद्यार्थ्यांच्या क्रांती आंदोलनात सहभागी झाल्याने विद्यापीठाने त्यांना रस्टिकेटही केले. परंतु सन 1891 मध्ये त्यांनी दूरस्था विद्यार्थी म्हणून कायद्याची पदवी मिळवली.

 

असे बनले नेता
सन 1889 मध्ये त्यांनी स्थानिक मार्क्सवादी संघटना स्थापन केली. यानंतर त्यांनी वकिलीही सुरू केली. मग त्यांना मार्क्सवादी नेता म्हणून ओळख मिळाली. आपल्या क्रांतीदरम्यान त्यांना तुरुंगातही जावे लागले आणि त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली.


बोल्शेव्हिक क्रांती
मार्क्सवादी विचारवंत लेनिन यांच्या नेतृत्वात 1917 मध्ये रशियात क्रांती झाली. 
त्या काळात जनतेमध्ये जागतिक महायुद्धावरून प्रचंड संताप होता. त्यानंतर बोल्शेव्हिक गटातील लोक सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले. हळूहळू बोल्शेव्हिकांनी सरकारी इमारतींवर कब्जा करायला सुरुवात केली. याप्रकारे सत्तेवर बोल्शेव्हिकांनी सत्ता काबीज केली. ही रशियन क्रांती होती, जिने रशियाचा चेहरामोहरा अन् भविष्य बदलले. ब्लादिमीर लेनिन सत्तारूढ झाले.

 

लेनिनवादाचा उदय
रशियन कम्युनिस्ट पार्टी (बोल्शेव्हिक पक्ष) चे संस्थापक लेनिन यांच्या मार्क्सवादी विचारांना \'लेनिनवाद\' म्हणून ओळखले जाते.
लेनिन म्हणाले होते की, मजुरांचे अधिनायकशाही वास्तवात बहुतांश जनतेसाठी खरीखुरी लोकशाही आहे. त्यांचे मुख्य काम दबाव वा जोर-जबरदस्ती नव्हे तर संघटनात्मक आणि शिक्षणासंबंधीचे कार्य आहे.

परदेशी सैनिकांच्या हस्तक्षेप आणि गृहकलहाच्या 3 वर्षांत (1928-30) लेनिन यांनी परदेशी आक्रमक आणि प्रतिक्रांतिकारकांना आव्हान देण्यासाठी सोव्हिएत जनतेला मार्गदर्शन केले. यामुळे 1922 मध्ये सोव्हिएत संघाची स्थापना झाली.


कुठे होते टीका, तर कुठे समर्थन
जगाच्या इतिहासात लेनिन यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. असे असले तरी त्यांना वादग्रस्त आणि भेदभाव पसरवणारा नेताही मानले जाते. लेनिन समर्थक नेहमी त्यांना समाजवाद आणि समानतेच्या कार्यप्रणाली चॅम्पियन मानतात, तर त्यांचे टीकाकार त्यांना अशा हुकूमशाही सत्तेच्या नेतृत्वाच्या रूपात आठवतात, जो राजकीय अत्याचार आणि मोठ्या प्रमाणावरील नृशंस हत्याकांडांसाठी जबाबदार आहे. 


मृतदेहावर अजूनही नाहीत अंत्यसंस्कार
वयाच्या 54 व्या वर्षी स्ट्रोकमुळे लेनिन यांचे निधन झाले. तो दिवस होता 24 जानेवारी 1924. 
- सोव्हिएत रशियन सरकारने येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळत राहावी यासाठी लेनिन यांचा मृतदेह संरक्षित करण्याचा निर्णय घेतला. म्हणून लेनिन यांना आधुनिक जगातील पहिली \'ममी\' म्हणून ओळखले जाते. यासाठी त्यांच्या शरीरावर केमिकलने नियमित प्रक्रिया केली जाते व इंजेक्शनही दिले जाते. यामुळे आजही लेनिन यांचे शरीर जिवंत असल्याचे दिसते. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, रशियन क्रांतीचे महानायक लेनिन यांचे फोटोज विथ FACTS...

बातम्या आणखी आहेत...