आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारत माता की जय’च्या घोषणा देत त्रिपुरामध्ये पाडला लेनिनचा पुतळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अागरतळा- दक्षिण त्रिपुरातील बेलोनियात सोमवारी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत लेनिनचा पुतळा पाडण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे महासचिव आणि ईशान्यकडील राज्याचे प्रभारी राम माधव यांनी या घटनेचा फोटो टि्वटरवर शेअर करत “रशियात नव्हे तर त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडला जात आहे. चला परिवर्तन करूया,’ असा मजकूर लिहिला. ३ मार्चला निवडणूक निकालानंतर त्रिपुरातील डाव्या पक्षांची २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. राज्यात पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळाले असून ८ मार्चला नवीन सरकारचे शपथग्रहण होण्याची शक्यता आहे. निकालाच्या दिवसानंतर राज्यात विचारधारेशी संबंधित हिंसेच्या घटना वाढल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...