आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • प्रेग्नंट असूनही 8 तास सलग उभी राहून करत होती ड्यूटी, सुटी न मिळाल्याने झाला मृत्यू Life After Abortion

धक्कादायक: प्रेग्नंट असूनही 8 तास सलग उभी राहून करत होती ड्यूटी, सुटी न मिळाल्याने झाला मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिमला - रिपन हॉस्पिटलमध्ये सिक्योरिटी गार्ड असलेल्या 8 महिन्यांच्या प्रेग्नंट पिंकीचा गर्भपातानंतर मृत्यू झाला. 25 वर्षीय पिंकीला डॉक्टरांनी प्रेग्नन्सीच्या 8व्या महिन्यात आराम करण्याचा सल्ला दिला होता, तरीही ती ड्यूटी करत होती. कारण तिचा सुपरवायझरने तिला सुटी नाकारली होती. पिंकीकडून रात्रपाळीतही सिक्योरिटी गार्डची ड्यूटी घेतली जात होती. 2 दिवसांपूर्वीच 6 जून रोजी पिंकीची तब्येत बिघडल्याने तिला अॅडमिट करण्यात आले, तेव्हा तिचा गर्भपात झाला. गर्भपातानंतर तब्येत आणखीनच बिघडली आणि ब्रेन हॅमरेज झाले. पिंकीला सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आले. परंतु 7 जून रोजी तिचा मृत्यू झाला. 

 

सुपरवायझरवर छळ केल्याचा आरोप...
- पिंकीच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सहकारी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रिपन रुग्णालयात आणि येथे तैनात आपल्या सुपरवायझर्सवर तिचा छळ केल्याचा आरोप केला. 
- आरोप आहे की, डॉक्टरांनी पिंकीला आराम करण्याचे लेखी लिहून दिल्यावरही तिला सुटी देण्यात आली नाही. तिला ना सिक्योरिटी इंचार्जने सुटी दिली ना रुग्णालय प्रशासनाने तिच्याकडे गांभीर्याने बघितले. महिला सिक्योरिटी गार्डच्या या अचानक झालेल्या मृत्यूनंतर सकाहीच रुग्णालय परिसरात प्रशासनाकडून एक शोकसभा आयोजित करण्यात आली.
- येथे डॉक्टर, नर्सेस व इतर स्टाफच्या सदस्यांनी दोन मिनिटांचे मौनही पाळले.

 

असे आहे पूर्ण प्रकरण
- आयजीएमसीमध्ये सिक्योरिटीवर तैनात जवळपास अर्धा डझन महिला म्हणाल्या- पिंकी भारती मागच्या 8 महिन्यांपासून प्रेग्नंट होती. तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा लेखी सल्लाही दिला होता. परंतु तरीही ती ड्यूटीवर येत होती. त्या सर्वांचे म्हणणे होते की, आम्हीही रुग्णालय प्रशासन, सिक्योरिटी इंचार्ज यांना सुटी देण्याविषयी म्हणालो होतो, परंतु त्यांनी सुटी दिली नाही.
- सलग 8 तास उभे राहून ती ड्यूटी करत होती. तिला बसण्याचीही परवानगी नव्हती. आराम तर दूरच. फक्त 6 हजार रुपये पगारासाठी सिक्योरिटीमध्ये तैनात कर्मचाऱ्यांचा एवढा छळ केला जात आहे. जर एखाद्याने सुटी घेतली, तर त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते.

 

पिंकीला एक लहान मुलगीही आहे...
सिक्योरिटी गार्ड पिंकी सिमल्याच्या अर्की परिसरातील रहिवासी होती. गत गुरुवारी तिला गंभीर अवस्थेत रिपन रुग्णालयातून आयजीएमसीला पाठवण्यात आले. तेथून पुन्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. येथे रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे एक लहान मुलगी आहे. रिपन रुग्णालयात 11 महिला कर्मचारी सिक्योरिटीमध्ये तैनात आहेत. त्या दिवसा तसेच रात्रीही ड्यूटीवर तैनात असतात. येथे 24 सुरक्षा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. पैकी 11 महिला आहेत. 

बातम्या आणखी आहेत...