Home | National | Other State | मोठी बातमी: 5 राज्यांमध्ये पाऊस अन् वीज पडून 48 जण ठार Lightning Kills 48 In 5 States In India, Weather Latest News And Updates

दिल्ली-एनसीआरमध्ये धुळीचे वादळ, 18 फ्लाइट डायव्हर्ट; 5 राज्यांत वादळ-वीजेचे 48 बळी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 09, 2018, 06:42 PM IST

देशाच्या दक्षिणी राज्यांसोबतच महाराष्ट्रापासून मान्सून गुजरातकडे कूच करत आहे.

 • मोठी बातमी: 5 राज्यांमध्ये पाऊस अन् वीज पडून 48 जण ठार Lightning Kills 48 In 5 States In India, Weather Latest News And Updates

  > मान्सूनची देशाच्या दक्षिण राज्यांसोबतच महाराष्ट्र आणि गुजरातेकडे कूच.

  > मेपासून आतापर्यंत वादळ व वीज पडून देशभरा 350 हून जास्त बळी.

  लखनऊ/रांची/पाटणा/नवी दिल्ली/भोपाळ - दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी सायंकाळी हवामान अचानक बदलले. सुमारे ताशी 80 किमी वेगाने धुळीचे वादळ उठले. 5 वाजताच अनेक भागांमध्ये अंधार पसरला आणि पावसाला सुरुवात झाली. खराब हवामानामुळे दिल्लीकडे येणाऱ्या 18 विमानांचे मार्ग बदलण्यात आले.

  देशाच्या दक्षिणी राज्यांसोबतच महाराष्ट्रापासून मान्सून गुजरातकडे कूच करत आहे. मान्सून शनिवारपर्यंत मुंबईत पोहोचला. दुसरीकडे, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील काही भागांत शुक्रवारी मान्सूनपूर्व पाऊस झाला. या राज्यांमध्ये पाऊस आणि वीज पडून झालेल्या दुर्घटनांमध्ये 48 जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या किनारी भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये वेळेआधीच मान्सून पोहोचला. हवामान विभागाने देशाच्या 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

  सर्वात जास्त 24 मृत्यू बिहारमध्ये
  - वीज पडून बिहारमध्ये 24, यूपीमध्ये 11 जणांचा मृत्यू. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून बिहारमध्ये 24, उत्तर प्रदेशमध्ये 11, झारखंडमध्ये 9, ओडिशा आणि मध्य प्रदेशात 2-2 जणांचा मृत्यू झाला आहे.

  - बिहारमध्ये 31, झारखंडमध्ये 8, मध्य प्रदेशात 7, ओडिशामध्ये 3 जण जखमी झाले आहेत. राजस्थान, पंजाब आणि हरियाणात कडक उन्हाचा परिणाम जाणवत आहे.

  - श्रीगंगानगर, कोटा, बिकानेर, पिलानी आणि जयपुरात तापमान 45.3 डिग्रीहून 42.2 डिग्री सेल्सियसपर्यंत नोंदवण्यात आले आहे.

  - दुसरीकडे, हवामान विभागाने पुढच्या 24 तासांत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळसहित 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशात वादळ, विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. तथापि, मे पासून आतापर्यंत वादळी पाऊस आणि वीज पडून देशभरात 350 हून जणांचे प्राण गेले आहेत.

  महाराष्ट्र आणि गुजरातेकडे मान्सूनची कूच
  - दक्षिणी राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातेकडे मान्सूनची आगेकूच सुरू आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये शुक्रवारी मान्सूनचा पहिला पाऊस बरसला. हिमाचल प्रदेशच्या सिमलासहित इतर ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
  - हवामान विभागाने बंगालच्या खाडीत 9-10 जून आणि अरब सागरात कोंकण आणि गोव्याच्या किनाऱ्यावर 12 जूनपर्यंत वेगवान वाऱ्यांसह समुद्राच्या उंच लाटा उसळण्याचा इशारा जारी केला आहे. यादरम्यान 60 किमी प्रति तासाच्या वेगाने वारे वाहिले.
  - मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कर्नाटक, महाराष्ट्रासह गुजरातच्या पश्चिमी परिसरात पुढच्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातही पाऊस होईल.

  शनिवारी 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट
  - हवामान विभागाच्या मते, 9 जून रोजी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशा, त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, मणिपूर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणमध्येही मुसळधार पाऊस होऊ शकतो. दुसरीकडे, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागांत वादळ आणि वीज कडाडण्याची शक्यता आहे.

  मुंबईत 2 दिवसांत होऊ शकतो 8 इंच पाऊस
  - मान्सूनने मुंबईत धडक दिलेली आहे. आता महाराष्ट्राच्या इतर शहरांतून गुजरातेकडे कूच करत आहे. हवामान विभागाचे अॅडिशनल डायरेक्टर जनरल डॉ. एम. महापात्रा म्हणाले की, 9 आणि 10 जून रोजी मुंबईत 8 इंचापर्यंत मुसळधार पाऊस होऊ शकतो. संभाव्य धोका पाहून बीएमसीने कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. किनारी भागात नौसेनेच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.

 • मोठी बातमी: 5 राज्यांमध्ये पाऊस अन् वीज पडून 48 जण ठार Lightning Kills 48 In 5 States In India, Weather Latest News And Updates

Trending